पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ एक कल्पना आली. ती अशी की, वेष पालटून राज- पुत्राने स्वतः स्पेन देशांत जावें, आणि तेथील राजाचे मु लीस भेटावें. बकिंगम याचे मनांत होतें कीं, कसे तरी करून राज- पुत्राची मर्जी संपादावी, ह्मणून तो याचे बरोबर जावयास तयार झाला. वास्तवीक अर्थी राजानें हा बेत तडीस जाऊं देऊं नये, परंतु त्यानें त्यास उलटी मदत केली. मग ते निघाले; त्यांस मार्गी जो वृत्तांत घडला, त्याचे वर्णन केले तर अनेक काव्ये होतील; आणि झालींही आहेत. ते पुढे लग्न सिद्धीस गेलें नाहीं; त्याचे कारण काय; हें को- णी ग्रंथकार लिहीत नाहीं; ह्मणून कवीनीं जें वर्णिले आहे कीं, तो चार्लस, फ्रान्स देशचा चतुर्थ हेनरी त्या- च्या मुलींविषयीं सकाम झाला; हीच गोष्ट खरी मानिली पाहिजे. पुढे त्याचे आणि त्या फ्रेंच राजकन्येचें लम झाले. अशी अव्यवस्था पाहून लोकांस वाईट वाटू लागले. त्या वेळेस कामन्स यांचे समेत अगदी बंदोवस्त नाहींसा झाला होता; त्याचे कारण कीं, जेम्स राजा आपले मित्रां- करितां द्रव्य फार उधळीत असे, त्यामुळे त्यास पैक्याची गरज लागूं लागली, ह्मणून तो आपले अधिकाराचे विभाग करून अनुक्रमानें कामन्स यांस विकीत चालिला. जसी जसी राजाची गरीबी स्पष्ट दिसूं लागली, तसे तसे ते अधिक अधिक जुलूम करूं लागले; आणि कांहीं पैका दिला ह्मणजे समजावें कीं, त्यावरोवर कांहीं तरी माग- ण्याची अर्जी आहेच. प्रति सभेसमयी पार्लमेंट आणि तो जेम्स यांमध्ये तंटा वाढत चालला; शेवटाचें सेशन