पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५५ प्रमाणे त्याचे प्रधान वागले. असे की, इंग्लिश राजाचा जर्मनी देशचा प्रांत हानोवर याचे संरक्षण होण्याकरितां अवश्य होतें कीं, दुसरे कोणते राज्य फार वळकट न व्हावे असे समजून राजाचे मर्जी याकरितां राजानें आपले फौजेची एक टोळी नेदर्लंड देशांत पाठविली; आणि तिला सोळा हजार हानोवर प्रांतांतील लोकांची भर देऊन हंगरी देशचे राणीचे मदती करितां फ्रान्स देशावर पा ठविली. मग त्याच्या मदतीनें राणीस जय येऊं लागला. तिनें फ्रेंच यांस बोहिमिया प्रांतांतून काढून दिले. तिचा सरदार राजपुत्र चार्लस यानें पुष्कळ फौज घेऊन बवे- रिया प्रांतावर हल्ला केला. तिचा शत्रु जो एंपरर नेमला होता, तो पळून गेला, त्याचे स्नेही होते त्यांनीही त्यांस सोडिलें. त्याचे पूर्वजांचें राज्य होते तेही गेले, आणि याप्रकारें तो फ्रांकफर्ट शहरांत जाऊन राहिला. ब्रिटिश सरकारची आणि आस्त्रियन फौज एकत्र होऊं नये, ह्मणून फ्रेंच यांनी मेन नदीवर मार्शालनो ऐल्स या नांवाचे सरदाराचे हातांखालीं साठ हजार फौज ठेविली, त्या सरदारानें आपले लो- इ०स० कांसहवर्तमान नदीचे कांठावर तळ दिला. दुसन्या १७४३ वाजूंवर सुमारें चाळीस हजार ब्रिटिश फौजेचा उद्योग चालला होता; परंतु त्यांस सामान सुमानाचा पुरावा हो- ण्याचीं सारी द्वारें फ्रेंच यांनी बंद केलीं होतीं. अशा संकट अवस्थेत फौज असतां राजा तेथे येऊन पोंचला, आणि त्या वेळेस बारा हजार हानोवर प्रांतांतले लोक व हेसियन लोक हानो शहराजवळ येऊन पोंचले होते; त्यांस पुढे जाऊन मिळावे असा निश्चय त्यानें केला; परंतु