पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ सर्व लोक फार संतुष्ट झाले; परंतु त्यांमध्यें बाथ एथील अल पुल्टनी यावर त्यांचा फारच राग झाला. पूर्वी लो- कांची प्रीति यावर फार होती; परंतु त्याची लबाडी पाहून त्यांचें त्याविषयीं मन बदललें. आणि राजानेंही तसेच समजून त्यास जन्मवर कांहीं काम सांगितले नाहीं. इसवी संन् १७४० त जर्मनी देशचा एंपरर मेला, तेव्हां आपलें सामर्थ्य वाढवावयाची ही चांगली संधी आहे, असें फ्रेंच यांनी जाणिलें. प्राग्माटिक सांक्शन ह्मणजे एंपरर याचे सगळे राज्य मार्गे त्याचे मुलीनें चालवावें, असा जो तह ठरला होता, तो मोडून त्यांनीं ववेरिया एथील इलेक्टर यास राज्यावर नेमविलें. साहावे चार्लस राजा- ची मुलगी हंगारी देशची राणी होती, तिचे वारिशास आलेला अधिकार या रीतीनें नाहीं असा झाला; तिला एक वर्षपर्यंत सर्वांनी सोडून दिली; आणि तिला कांही आशेचें स्थळ राहिलें नाहीं. तिच्या बापाचे डोळे नुकते झांकत आहेत इतक्यांत प्रशिया देशच्या राजाने सिलि झिया प्रांतावर स्वारी करून तो तिचा घेतला. वास्तवीक पाहिले असतां त्या राजाचे पूर्वजांपासून तो प्रांत मुळी अन्या- यानेंच घेतला होता, ह्मणून आतां त्यानें त्यावर दावा केला. बाकीचे तिच्या मुलुखावर फ्रान्स, साक्सनी, आणि बवे- रिया, यांनी येऊन हल्ले केले; व तिचे निराश्रय स्थितीत सहाय करणारा. एक इंग्लंड देश मात्र राहिला. नंतर साडिनिया, हालंड, व शेवटीं रशिया हे तीन तिला सहाय झाले. एथें असे मनांत येतें कीं, या महाद्वीपांतील तंट्यांत पडावयास इंग्लिश यांस काय कारण होतें ? याचें उत्तर