पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ ते सुचेना. कित्येक घटिकापर्यंत तो भयंकर मार मोठे शौर्यानें सोसून शेवटी फौज परतली. त्या लढाईचे ठि- कांणी साहाशें लोक पडले. या लढाईपेक्षां तेथील हवेनें सैन्याचे बहुत हाल झाले. पाऊस असा पडूं लागला कीं, तळ देऊन राहावेना, आणि त्या ऋतूमुळे अनेक प्रकारांनी मृत्यु येऊं लागले. या विपत्तींत दुसरी एक अडचण झाली. ती अशी की, फौजेचे आणि गलबतांचे सरदारांत तंटा पडल्यामुळे, कांही गोष्ट सिद्धीस गेली नाहीं. शेवटी त्या दोघांनी इतकें कबूल केलें कीं, फौजेनें गलवतावर चढून या भयंकर जागेतून जावें. तसें करून ते आले, आणि इंग्लंड देशांत तें फजीतीचें वर्तमान समजतांच सर्व लो- कांस वाईट वाटून ते कुरकूरूं लागले. पूर्वी जरी अमात्याचे द्वारे जय मिळाला नव्हता तरी त्याची स्तुति झाली; आतां तो या उपद्रवास कारण नसतां लोक त्याची निंदा करूं लागले. मग कामन्स यांचा क्रोध आपल्यावर झाला, व आपले पदाचें संरक्षण होण्याविषयीं यत्नकरून फळ नाहीं, असें पाहून प्रधानानें सांगितले की, मी पुढे का- मन्स सर्भेत वसणार नाहीं. त्याचे दुसरे दिवशीं कांहीं दिवसांचे मुदतीने पार्लमेंट सभेस निरोप दिला;- आणि तितक्यांत सर राबर्ट वाल्पोल यास, अर्ल आक्स फर्ड असे पद मिळून त्यानें सर्व काम कारभार सोडून दिला. त्या प्रधानाचा मोड झाला; परंतु कांहीं फळ झाले नाहीं; कां कीं, पूर्वी ज्यांनी लोकांचे स्वतंत्रतेचे संरक्षणा- विषयीं मोठमोठ्या प्रतिज्ञा केल्या होत्या, त्यांस नवे उद्योग मिळतांच, त्यांच्या बुद्धि फिरल्या. त्यांस लवाड समजून इ०स० १७४१