पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ ते सैन्य क्याथेंजिना देशांत पोचल्यावर त्यांनी एक तोफा लावावयाची जागा केली; आणि तेथून मुख्य कि- ल्यास वाट पाडली. त्या वेळेस गलवतांचा सरदार वर्नन यानें त्याचे मदतीकरितां बंदरांत कित्येक गलबतें पाठविलीं, किल्ल्यांत वाट होईल, असे दिसून आल्यावर एक फौजे- च्या टोळीस अकस्मात् हल्ला करावयाचा हुकूम केला. त्या वेळेस स्पानियर्ड यांनीं धीर धरिला असता, तर कि ल्याचा बचाव झाला असता; परंतु ते तो सोडून भयानें पळून गेले. ही थोडी फत्ते झाल्यावर फौज शहराजवळ गेली; परंतु तेथें तीस अकस्मात् अटकाव झाला. अशी बातमी उठली की, किल्यास वाट पाडितां यावी, इतकीं जवळ गलबतें नेतां येईनांत; ह्मणून फौजेनें किल्यावर चढावें इतकें मात्र बाकी राहिलें. गलवतांचे आणि जेचे फौ मुख्य एकमेकावर दोष. ठेवीत. एक जें नाहीं ह्म- णत, ते दुसरे होय ह्मणत. शेवटी आडमरल याचे वो- लण्यामुळे वेंट्वर्थ यानें सेंट लाझेर किल्यावर हल्ला करून चढण्याचा हुकूम दिला; परंतु त्यापासून बहुत नाश झाला. तो असा कीं, फौज जात असतां वाट दाखविणार होते त्यांस मारिलें, त्यामुळे फौज वाट चुकली. शहराच्या दुर्बळ भागावर त्यांनी हल्ला करावा, ते टाकून जिकडे वळकटी होती तिकडे यत्न आरंभिला; कीं, जेथे शहराचा मार त्यांच्या आंगावर येई. ग्रानाडियर यांचा सरदार कर्नल ग्रांट साहेब होता, तो प्रथमच पडला. पुढे लवकरच त्यांच्या चढण्याच्या शिड्या फार आखुड असे आढळले; हुकूम नाहीं ह्मणून सरदार लोक संकटांत पडले; शत्रूंचा सारा मार सैन्यावर पडला, व पुढे काय करावे.