पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५१ व तेथचे लोक गलबतावर घेऊन अमेरिका देशास नि- घाला. तेव्हां अतिशय संकटें भोगून इतके दिवस ज्या स्पानिश गलबताची तो आशा करीत होता, तें त्यानें पा- हिलें. त्यावर साठ तोफा व पांचशे लोक होते; इकडे कमोडोर याजवळ त्याचे अर्धेही नव्हते. असे असतांही इंग्लिश यांकडचाच जय झाला; आणि ते ती मातबर लूट घेऊन आले. तिची किंमत सुमारे तीन लक्ष पौंड झाली. पूर्वी गलबतें सांपडलीं होतीं, त्यांतलाही पैका इतकाच सांपडला होता. या प्रकारे तीन वर्षे पर्यंत मोठ्या श्रमाने आणि धैर्याने प्रवास केल्यापासून थोडे लोकांस बहुत द्रव्य प्राप्त झाले; परंतु एक मोठे अरमाराची नुक- सानी सरकारास झाली. त्या वेळेस इंग्लिश यांनी मोठे हुशारीने काम चाल- विलें होतें. आन्सन इंग्लंड देशांतून गेला, त्याच वेळेस न्युस्पेन देशावर हल्ला करावयाकरितां दुसरे एक अरमार एकुणतीस मोठीं गलबतें, तितकींच सुमारें फ्रिगेट, सुमारें १५००० खलाशी लोक, व तितकेंच दुसरे पायदळ देऊन पाठविलें होतें. या शेवटीं सांगितलेले अरमारास आन्सन यानें मदत करावी असे योजिलें होतें. अशी चांगले रीतीनें अरमाराची तयारी कधींही झाली नव्हती, व लोकांनीही विजयाची अशी कधीं आशा केली नव्हती. जमीनीवरचे पायदळाचा सरदार लार्ड क्याथकार्ट ह्मणून गृहस्थ होता त्यास नेमिलें. तो वाटेनें मेला ह्मणून सरदार- पणा जनरल वेंट्वर्थ नामें साहेबाजवळ आला. त्यामध्ये एवढे कामास योग्य गुण नव्हते, असे लोकांचे ध्यानांत आले. १४