पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० केली. डेरियन कामांत त्यास गलबतांचा उपयोग पडला नाहीं. थोडे शिपायांनीं काळोकाचे आश्रयानें सर्व शहरांत धामधुम त्या ठाण्यांतील अंमलदार, व तेथील लोक चहूं- कडून पळाले. इंग्लिश यांचे थोडेसे लोक त्या शह- रांत तीन दिवसपर्यंत अंमल राखून, तें लुटून जाळून गेले. अमेरिका महाद्वीपाचे पश्चिम दिशेस इस्थमस यावरील पानामा प्रांतापर्यंत तीं गलबतें पुढें लव- करच पोंचलीं, तेथें कमोडोर यानें योजिलें कीं, जीं मातबर गलबतें फिलिपिन बेटापासून मेक्सिको देशास व्यापाराकरितां जातात, त्यांतील एक घ्यावें. एका दे- शापासून दुसरे देशास अशीं मातबर गलबतें प्रतिवर्षी एक दोहोंवर जात नसत; ह्मणून त्यांवर पुष्कळ द्रव्य न्यावया- जोगी मोठी आणि त्याचें संरक्षण करावयाजोगीं वळ- कट असत. यांतून एकादें भेटेल, या आशेने कमोडोर आपले थोडेशे गलबतानिशीं पासिफिक महासागरांत चालिला, परंतु पूर्ववत् पुनः एकवेळ त्याचे लोकांस स्कर्वी रोगाचा उपद्रव झाल्यामुळे कित्येक मेले, आणि बहुतकरून सर्व अशक्त झाले. अशा संकट अवस्थेत त्यानें आपले सारे लोक एके गलबतांत आणिले; आणि दुसऱ्यास आग लावून • देऊन तिनियन नामें बेट आहे तेथे पोचला. रमणीय स्थळी तो आपले लोक बरे होईपर्यंत व गलबतें नीट होईपर्यंत राहिला. त्या याप्रमाणें सिद्धता करून तो तसाच पश्चिमेकडून चीन देशास गेला. ज्या अमर्याद महासागरांत त्याने इतकी दुःखें भोगिलीं होतीं, त्यांत पुनः जाऊन पडावयाकरितां . त्यानें तेथें सामानाची तरतूद केली; आणि कित्येक डच