पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४९ हे त्यांचे तर्क निष्फळ झाले, आणि त्याने साहाच गलबतें घेऊन जाऊन त्या ठिकाणचे सर्व किल्यांवर हल्ला करून ते जमिनीस मिळविले; आणि त्याचे माणसांचा फार नाश न होतां तो विजयी झाला. त्यामुळे इंग्लंड देशांत त्याची कीर्ति फार झाली. या रीतीनें सर्वत्र तयारी चालली असतां, दक्षिण समु द्रांत शत्रूंचा नाश करण्याविषयीं कमोडोर आन्सन यास आरमार देऊन पाठविलें. असे योजिलें होतें कीं, त्या ग लबतांनी मागेलन स्त्रेट यांतून चिलि आणि पिरु देशाचे कांठाने उत्तरेकडेस जाऊन डेरियन इस्थ्मस या पलीकडे आडमरल वेर्नन होता, त्यास मदत करावी. हा बंदोब- स्त प्रधानाचे विलंबामुळे फुकट गेला. समय गेल्यानंतर कमोडोर आपले बरोबर पांच मोठीं गलबतें, एक प्रिगेट, आणि दोन सामानाचीं गलबतें, व सुमारे चवदारों लोक घेऊन निघाला. त्यानें ब्राझिल देशचे कांठावर त्या उष्ण देशांत अति रमणीय, फळें व पुष्पे पुष्कळ, असें सेंट क्या- थेरीन ह्मणून बेट आहे, तेथे काही दिवसपर्यंत आपले लो- कांस विश्रांति दिली. पुढें तो दक्षिण दिशेस पृथ्वीचे शी- तळ प्रदेशीं चालिला; आणि एके भयंकर वादळांतून निभावून पांच महिन्यांत केप होने यास प्रदक्षिणा करून उत्तरेस गेला. त्या वेळेस त्याचे गलबतांची फाटाफूट झाली, लोकही स्कर्वी रोगामुळे फार हैराण झाले, ह्मणून त्यास जुआन फर्नांदिस बेटांस पोंचावयास मोठे संकट पडले. तेथें त्यास एक तारूं व सात तोफांचें गलबत, अशीं दोन येऊन मिळा- ली. तेथून उत्तरेस त्यानें चिली प्रांताचे कांठांवर उत रून पैटा शहरावर रात्रीं हला केला. असे मोठे धीराचे