पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ गितलें नाहीं. कों, पार्लमेंट सभेने त्याची चौकशी करितां स्पेन देशचे सरकारानें इंग्लिश सरकारास द्रव्य देण्याचा करार केला होता, त्याप्रमाणे दिलें नाहीं, व न देण्याचे कारणही सां- असा सर्वांचा आग्रह पाहून मुख्य प्रधा- नानें लढाईची तयारी केली; आणि ती पाहून शत्रूही ल- ढावयास सिद्ध झाले. त्या भयंकर प्रसंगी हेग शहरांत फ्रेंच यांचा वकील होता त्याने कळविले की, तह ठर- ल्याप्रमाणें फ्रेंच राजा स्पेन देशचे राजास मदत करणार. पूर्वी वीस वर्षांचे मागें जो तहनामा ठरविला, तो या रीतीनें उलटा केला. तो असा, - त्या वेळेस फ्रान्स आणि इंग्लंड हे उभयतां मिळून स्पेन याशीं विरुद्ध झाले होते; आतां स्पेन आणि फ्रान्स मिळून इंग्लंड देशावर उठले. या- वरून कळते की, तहाचा कांहीं भरवसा नाही. राज्या- मध्ये किती स्थिर जरी तह ठरले, तरी राजनीतिज्ञांनी त्यांचे भरंवशावर राहू नये. र्याचा सरदार होता, पुढे फौज वाढण्याचा हुकूम केला; आणि लढाईची प्रतिज्ञा समारंभानें केली. मेदितरेनियन समुद्रांत शत्रूंचीं दोन गलबतें धरिलीं. वेर्नन नामें आड्मरल मोठा घे- त्यास अमेरिका देशांत शत्रूंचा नाश करावयाकरितां आरमार देऊन पाठविले. त्याने कामन्स सभेत सांगितले होतें कीं, पोर्टोबेलो ह्मणून द- क्षिण अमेरिका देशांत एक समुद्रकांठचें शहर आहे, ते सहज स्वाधीन होईल; आणि प्रतिज्ञा केली होती की, सा- हा गलबतांनिशीं भी स्वतः तें घेईन. ही त्याची प्रतिज्ञा त्या वेळेस व्यर्थ अशी वाटली होती. त्याचे पक्षाचा अ भिमान कमी करावयाकरितां ती कबूल केली होती; परंतु ..