पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४७ फार उपद्रव केला होता; आणि ब्रिटन देशांतील व्यापा- ज्यांनी त्या देशांत चोरून व्यापार करण्याचा उद्योग चा लविला होता. क्यांपीची एथील समुद्राचे क्रांठावर लां- तोडावयाची मोकळीक इंग्लिश यांस तहाप्रमाणें होती. तेव्हां ते त्या प्रधानानें त्या देशांत कांहींतरी, जिं नस कसातरी पाठवीत; ह्मणून स्पानियर्ड यांनीं ती मोकळीक नाहीं, अशी करण्याची मसलत आरंभिली. हीं लांकूड तोडण्याची मोकळीक बहुत वेळ मान्य झालेली होती; परंतु तिचा निश्चय कधींच झाला नव्हता. कारण की, पूर्वीचे तहनाम्यांत तें एक वेगळे कलम लिहावयास कांहीं कारण ध्यानांत आले नव्हते. तो कांठ राखण्याकरितां जीं स्पानिश गलबतें नेमिलीं होती, त्यांनी इंग्लिश यांवर दुष्टपणा चालविला. बहुत ब्रिटन देशचे लोकांस पो- टोसी गांवच्या खाणी खाणावयास जावे लागले; की जेथून फिर्याद पोंचण्याचा उपाय नव्हता. या रीतीने करार नाम्याप्रमाणे चालण्यांत अंतर पडलें. ह्मणून माद्रिद एथील दरबारांत बोलणी पाठविलीं; त्यावर चौकशी क रितों, अशी त्यांनी उत्तरें देऊन कांहींच केले नाहीं. अशा दुःखाच्या फिर्यादी इंग्लिश व्यापाऱ्यांनी बहुत सांगितल्या; परंतु त्यांचा बंदोबस्त युद्धानें करावा, तें सो- डून तहानें होईल, अशी प्रधानांचे मनांत व्यर्थ आशा होती. इंग्लंड देशांतले दरबारानें भये दाखविलीं, तेणेंकरून शत्रूंचा आग्रह मात्र अधिक वाढला; आणि त्यांचे चौ- कीचे गलबतांनीं अपराधी आणि निरापराधी, हें कांहींच न पाहातां सवींस धरावयास आरंभ केला. असे दिसून आले