पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोठ्या धैर्याने मृत्यु पावला, आणि बोलिला कीं, कुन्हाडीचा घाय कठिण तर खरा, परंतु दुःखांतून एकदांच सोडवितो. त्याने शेवटीं लोकांपाशीं स्वस्थ चित्तानें बोलून आपले मस्तक खालीं केलें. त्या प्रसंगी राजानें राली यास मारावयास दुसरी सबब लाविली खरी, परंतु पुढे उघड दिसून आलें कीं, जेम्स राजा स्पेन देशचे सरकाराची तरफदारी करितो. याचें मूळ असें. राजास वाटत असे की, आपला मुलगा चार्लस प्रिन्स आफवेल्स याचें कोणते तरी राजाच्या मुलीशीं लम्र करावें. हें न केलें तर आपले प्रतिष्ठेची हानी होईल. तेव्हां लम कराया- जोगी मुलगी काय ती फ्रान्स देशचे राचाची किंवा स्पेन देशचे राजाची होती. कांहीं कारणामुळे त्यानें स्पेन देशचीच करायाचा बेत योजिला होता. पूर्वी स्पेन देशचा गाडिमर ह्मणून वकील इंग्लंड देशांत होता असे सांगितलें; त्या गृहस्थानें चार्लस यास स्पेन देशचे राजाची दुसरी मुलगी द्यावयाचा करार केला; आणि आशा लाविली कीं, तिचा बाप पुष्कळ आंदण देईल; परंतु हें काम लवकर संपायाचें नव्हे ह्मणून पांच वर्षे झाली तरी कांही लग्नाचा ठराव होईना. अशी हयगय पाहून राजाचा उत्साह भंग झाला; आणि राजपुत्र चार्लस यास ही फार दुःख झालें; तो राजपुत्र असा कांहीं विलक्षण पुरुष होता की, त्यानें जिला कधीं पाहिली नाहीं, तिज- विषयीं तो अतिशय सकाम झाला. विलियर्स ह्मणून रा जाचा मित्र सांगितला, त्याने कांहीं दिवसपर्यंत राजास आपले इच्छेप्रमाणे वागवला होता, त्याचे मनांत अशा समयीं इ०स०१६१८