पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४.५ बोलिला, "तेव्हां मी ईश्वराकडे क्षमा मागितली; आणि माझा देव याचा सूड उगवील अशी आशा केली." या बातम्या ऐकून लोकांस फार राग आला; परंतु प्र धानांनी त्याची फार चौकशी केली नाहीं. मग ब्रिटन देशचा राजा, जर्मनी एंपरर, आणि स्पेन देशचा राजा, या तिघांचा तहनामा ठरून वियेन्ना शहरांत सह्या झा व्या; करून युरोप खंडांत पहिले सारिखी स्वस्थता झाली; आणि लढाई होणार होती, ती कांही वेळपर्यंत राहिली. त्यावरून इंग्लंड देशचे राजास आशा वाटली कीं, आतां सारीं युद्धे बंद होतील, पार्मा एथील डयुक मे- ल्यावर डान कार्लोस, यानें आरमाराचे मदतीनें पार्मा आणि क्लासेन्शिया एथील अंगल कांहीं तंट्यावांचून घे- तला; आणि टस्कनी मुलुखांत साहा हजार स्पानियाई ठेविले. कारण की, तेथला डयुक मेल्यानंतर तें ठिकाण आपले स्वाधीन व्हावें. पुढे कांहीं वेळपर्यंत स्वस्थता चालली होती; तितक्यांत कांहीं विशेष गोष्ट घडली नाहीं. त्याकाळीं कि- त्येक लोकांनी एकीकडे मिळून एक मंडळी क रून तिचे नांव दान मंडळी, या अर्थाचे ठेविलें होतें. ती मंडळी एकत्र होण्याचे कारण हें कीं, गरी- बांस लहान जामीनगत घेऊन थोडे व्याजावर पैका उसना द्यावा; व श्रीमंतांस चांगली जामीनगत घेऊन द्यावा. तिचें भांडवल प्रथम तीस हजार पौंड होते; परंतु पुढे साहा लाख झालें. तो पैका टीप करून जमला होता, व त्याचा खर्चवेच करण्याचे कामावर कित्येक पुरुष ने- मिले होते. अशी ती मंडळी वीस वर्षेपर्यंत नीट चालली इ०स० १७३१