पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ आर्ज राज्याधिकार पावला. त्याची बुद्धि बापापेक्षा कमी होती; आणि त्यास महाद्वीपांतील राज्याचा बहुत पक्षपात असे. त्याचे हाताखालीं मोठे पदाचा अधिकारी एक सर राबर्ट वाल्पोल नामें गृहस्थ होता; तो मुळचा लहान प दवीचा असतां, अनुक्रमानें दोन राज्यांत मोठेपणास चढला होता. तो टोरी लोकांचा द्वेष करीत असे. राजाचा अख्या त्या वेळेस कमी झाला होता; तो राखावयाकरितां तो वाल्पोल, कामन्स यांस लांच देत असे; परंतु हा उपाय व्यर्थ गेला; कारण की, त्याकडचा पैका घेऊन त्यांची सत्ता मात्र बाढली. पूर्वीचे राज्यांत तह ठरले होते, ते मोडावयाचा प्रारंभी प्रथम स्पानियार्ड लोकांनी केला; आणि अशा बातम्या येऊं लागल्या की, स्पानिश सरकारचे गलबतांनी बहुत इंग्लिश व्यापाऱ्यांचे गलबतांस चांचे ह्मणून धरून लुटले. इंग्लिश यांचे प्रधानांस प्रथम या बातम्या केवळ खऱ्या वाटल्या नाहीत; आणि त्या उद्वतपणाचें निवारण तहाचे रितीप्रमाणेच होईल, अशी त्यांस आशा होती; परंतु शेक टीं त्याविषयीं फार फिर्यादी होऊं लागल्या. आणि क्या- पान्यांनी कामन्स यांस अर्जी दिली, त्यावरून त्यांनी चौ- कशी आरंभिली. कित्येकांस निरर्थक धरून फार दुःख दिले होते, त्यांची त्यांनी शायदी घेतली. एके गलबता चा धनी व्यापारी होता, त्यावर स्पानिश यांनी फार जु लूम केला होता; त्याचे साक्षीचे वेळेस त्याने फार स्वस्थ रीतीनें भाषण केलें; आपणास लुटून सर्व नेर्ले, कान कापले, व मारावयाची सिद्धता केली तें सांगितलें; आणि 201