पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४३ स्थानांत जाऊन दोन वर्षे झालीं होतीं, ह्मणून पार्लमेंट सभेस निरोप होतांच तो तिकडे जाण्याची सिद्धता करून आपले मागें कारभार चालविणारी मंडळी नेमून, गलबता- वर चढला; आणि वोएट ह्मणून लहान गांव हालंड दे- शांत आहे तेथे उतरला. तो दुसरे दिवशीं पुढे निघाला, आणि दोन दिवसांनी मध्यरात्रीचे सुमारे सुखरूप डेल्डेन शहरास पोचला. तेथे रात्रीं सुखाने भोजन करून दुसरे दिवशी सकाळी पुढे चालिला; इतक्यांत त्यानें प्रहर दिव- साचे सुमारे अकस्मात् रथ उभा करावयास आज्ञा केली. फाब्रीस या नांवाचा पूर्वीचा स्वीडन देशचे राजाचा एक चाकर तेव्हां राजाजवळ होता; तो राजाचा एक हात निर्जीव झाला पाहून रक्त फिरावयाकरितां रगडूं लागला. त्याने कांहीं झाले नाहीं, असे पाहून मागे घोड्यावर एक शस्त्रवैद्य होता त्यास बोलाविलें. त्याने दारू वगैरे यास चोळली, पण कांहींच झाले नाहीं; आणि त्याची जीभ सुजली. "मग तो राजा ओस्नाबर्ग शहरास चला;" इतकें मात्र सांगून फाब्रोस याचे हातांत बेशुद्ध पडला, आणि दुसरे दिवशीं दोन प्रहर दिवसाचे सुमारें मृत्यु पाव- त्या वेळेस त्याचे वयास अडसष्टावें वर्ष होते. त्याने तेरा वर्षे राज्य केलें. ला. प्रथम प्रकरण ३५. द्वितीय जार्ज राजाची कथा, सन १७२७ पासून १७६० पर्यंत. जार्ज राजा मेल्यानंतर, त्याचा मुलगा द्वितीय