पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ लेयर साहेबास टैबर्न ठिकाणीं फांशीं दिले. बाकीचे कोणावर शासन करावयाजोगे अपराधाचा पुरावा झाला नाहीं. . चान्सरी कोर्ट यांत बहुत लवाड्या होऊन न्याय होत नाहीं, असें पाहून त्या वेळेस कामन्स यांनी अर्ल माक्ल- स्फील्ड, टामस, चान्सेलर, यांवर लार्ड समेत आरोप ठेवून चौकशी करावी असा निश्चय केला. ती चौकशी होण्यास मोठे श्रम लागले. ती वीस दिवसपर्यंत झाली. अर्ल यानें त्या दरबारांतल्या जागा विकून पैसा जमा केला; आणि पूर्वीचे चान्सेलरही तसेच करीत असत, असा त्यानें पुरावा केला. परंतु ही गोष्ट अयोग्य दिसून आली, ह्मणून त्या वेळेस मागील वहिवाट एकीकडे राहून तो अल यावर लबाडी लागू झाली. त्यानें तीस हजार पौंड दंड द्यावा, आणि त्याचा फडशा होई तोपर्यंत कैदेत राहावें असें ठरले. हा दंडाचा फडशा त्याने पुढे दीड महिन्याचे आंत केला. त्या काळीं लोकांमध्ये धन आणि उपभोग वाढत चा लिले होते. तशोच लबाडी, असत्य, आणि लोभ हीं वि- शेष होत चालली होती. व्यापारामुळे कपट अधिक झाले; द्रव्यानें उधळेपणा वाढला. सर्व स्थितीचे लोकांत पातक, आणि दुर्गुण उत्पन्न होऊं लागले, ते बंद होण्या- करितां पार्लमेंट सभेनें कांहीं उपाय योजिले, परंतु ते सिद्धीस जाण्यास अमात्यांची संमति किंवा लोकांस तरी आवड पाहिजे होती; तें कांही नव्हते; ह्मणून त्यांपासून विशेष फळ झाले नाहीं. राजास आपले हानोवर देशांतले इलेक्टर याचे सं-