पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३९ क्यार्डिनल आल्बीरांनी नामें होता, त्याचे मदतीनें नवें एक बंड उत्पन्न करावें. त्या युद्धोद्योगांत मुख्यत्वें डयुक आर्मंड याची नेमणूक झाली. मग तो ड्युक, स्पानिश दरबारांतून लढाऊ व भाड्याची गलबतें दहा घेऊन नि घाला. त्यानें गलबतांवर युद्धाकरितां तयार अशी फौज साहा हजार व अणखी बारा हजारांची शस्त्रे वगैरे सामान बरोबर घेतलें; आणि तेथून निघून केप फिनिस्टर या पर्यंत आला, तंव मोठें एक वादळ होऊन त्याचीं गलबतें खराब झालीं, व उद्योग फसला गेला. हा एक पेंच आला; आणि स्पानिश यांचें सैन्य सिसिली व इतर देशांत जय पावलें नाहीं, या दोन कारणांमुळे फिलिप राजानें तह क- रावयाचा निश्चय करून शेवटीं चार पक्षी सरकारांचे तहनाम्यास कबूल झाला. त्या वेळेस ही गोष्ट मोठी झाली असें वाटलें; परंतु इंग्लंड देशचे द्वारे हे सर्व झाले असतां त्या देशाचें यापासून कांहीं हित झाले नाहीं. अशा समयीं कोणी जानला या नांवाचे स्काट्लंड देशांतील पुरुषानें मिसिसिपी या नांवाची मंडळी फ्रान्स देशांत जमवून लोकांस ठकविलें. तीपासून इ०स० बहुत द्रव्यलाभ होईल, असा त्या फ्रेंच लोकांचा १७२१ भरंवसा होता; परंतु अधिक विपत्तिमात्र प्राप्त झा- ली. तेव्हांच इंग्लिशही याच जातीचे एके उद्योगानें फसले गेले; ज्याचें नांव सौथसी कंपनी, आणि ज्या पा सून पुढे बहुत दिवसांनी हजारों लोकांनी दुःखे भोगिलीं. ही गोष्ट मुळापासून संक्षेपाने सांगतों. विलियम राजाचे राज्यापासून पार्लमेंट पैक्याचे पुराव्याची योजना करीत नसे, किंवा योजिला तो वसूल करावयास वेळ लागत असे, .