पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ कीच्यांस पुढचे वेळेपर्यंत ठेविलें. निथ्सडेल याचा शिर च्छेद व्हावयाचा त्याचे पूर्व रात्रीस त्याचे आईनें बायकोचा पोशाग त्यास आणून दिला, तो नेसून तो दैववशात् बचा- घला. नेमलेले वेळेस टवहिल या ठिकांणी डवेंन्ट्वाटर आणि केन्पुर यांचा शिरच्छेद झाला. दोघानींही ते शा सन शांत मनानें भोगिलें. पुढे एप्रिल महिन्याचे प्रारंभी बंडवाल्यांचे चौकशीवर नेमलेले कामगार लोक कामन प्लीकोर्ट एथे एकत्र जमा झाले. त्या वेळेस फास्टर साहेब, मकिंटाश साहेब व त्याचे साथी दुसरे वीस यांवर अपराध पत्रे केलीं. त्यांतून फास्टर न्यूगेट या नांवाचे मोठे बंदिखान्यांतू- न सुटून जाऊन सुखेंकरून महाद्वीपांत पोंचला. पिट्स ह्मणून पुरुष त्या बंदिखान्याचा रखवालदार होता, त्यानें फास्टर यास मुक्त करण्याचा उद्योग केला असेल, या शंकेनें त्याची चौकशी केली; परंतु त्यास सोडून दिले. इतकें झालें असतांही मर्किटाश आणि दुसरे कित्येक वं- दिवान, रखवालदारास व किलीवाल्यास मारून, व चौ- कीदारांची शस्त्रे घेऊन पळून गेले. मग बाकी राहिले होते त्यांची चौकशी होऊन टैबर्न नामक ठिकाणी चार पांचांस फांशीं देऊन शरीर फाडून तुकडे केले; बावीस लोकांचा शिरच्छेद प्रेस्तन आणि मांचेस्तर एथें केला, आणि सुमारे एक हजार बंदिवानांस उत्तर अमेरिका दे- शास पाठवून दिलें. 3 पुढे काही दिवसांनीं स्पेन आणि इंग्लंड एथील दर- बारांत वितुष्ट पडलें; त्यावरून प्रिटेंडर यांस पुनः कांहीं आशा आली. त्यानें योजिलें कीं, स्प्यानिश याचा प्रधान