पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० ह्मणून सरकाराने व्यापारी लोकांचे कित्येक मंडळ्यांपासून पैका उसनवार घेतला होता; आणि त्यांत जी मंडळी द क्षिण समुद्रांत व्यापार करीत होती तीकडूनही घेतला होता, त्या मंडळीनें सरकारास एक कोटी पौंड कर्ज दिलें, आणि वर्षास साहा लक्ष व्याज येत होतें, तें पांच लक्ष घेऊन ती राजी झाली. असें वर्तमान असतां, ब्लौंट या नांवाचा कोणी वकील होता; ज्यामध्ये असले कामाचे उपयोगी धूर्तता आणि बाह्य चातुर्य बहुत होते. त्यानें सरकारचे आमात्यांस सौथसी कंपनी इचे तर्फेनें विनंती केली कीं, आह्मी व्या- पारी लोकांचे बहुत मंडळ्यांचें सरकारावर कर्ज आहे, तें विकत घेऊन एकटीच ही कंपनी सरकाराची कर्जदार करितों. या बाबदचा करार त्यानें फार सोईचा केला; तो असा. सरकारचे कर्जदार जे लोक होते, त्यांकडून साथसी कंपनी इनें त्यांचे मर्जीप्रमाणे करार करून कर्ज आपले नावें करून घ्यावें; या रीतीने सर्व कर्ज तिचे नावे झाल्यावर सरकाराने साहा वर्षेपर्यंत शेकडा पांचप्रमाणे व्याज द्यावें; पुढे शेकडा चारप्रमाणे द्यावें; आणि जेव्हां पार्लमेंट सभेची मर्जी होईल तेव्हां त्या कर्जाचा फडशा करावा; परंतु या करारामध्ये मोठी लबाडी होती. ती अशी की, त्या मंडळीचे अंमलदारांजवळ सर्व राज्याचें कर्ज विकत घेण्याजोगे द्रव्य नव्हतें, ह्मणून त्यांस मोक ळीक दिली की, दक्षिण समुद्रांत व्यापार करावयाचे बे- ताने तुझी भागीदार जमवून पैका उत्पन्न करावा. त्या व्यापारापासून बहुत नफा होईल, असे त्या अंमलदा- रांनी दर्शविलें; आणि लोकांनीही त्यापेक्षां विशेष आशा मग .