पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३७ दिली. या रीतीनें जवळ कांहीं सत्ता नसून त्यानें राज- पणाचा सर्व डौल करून घेतला. अशी कांहीं वेळपर्यंत रिकामी शोभा करून शेवटीं त्यानें तो उद्योग ज्या नम्र- तेनें आरंभिला होता, तसाच सोडून देण्याचा निश्चय के ला. त्यानें आपले कौन्सिल यास सांगितले की, युद्धाचा उद्योग करावयाजोगें द्रव्य, शस्त्र सामग्री, आणि इतर साहित्य माझेपाशीं नाहीं ह्मणून तुह्मास सोडून जाणे मला अवश्य प्राप्त झालें. पुढे तो आपले पक्षाचे कित्येक लार्ड बरोबर घेऊन एके लहान फ्रेंच गलबतांत मोर्टोस बंदरामध्ये बसला, आणि चार पांच दिवशीं ग्रावेलिन शहरास पोहोचला. असे हें निरुपयोगी बंड समाप्तीस गेलें. या रीतीने जरी शत्रु नाहींसे होऊन विजय झाला, तरी जे विजय पा वले त्यांचा क्रोध कमी झाला नाहीं, आणि ज्यांवर अमा- त्यांनीं क्षमा करूंच नये ह्मणून निश्चय केला होता, अशे हतभाग्य लोकांनी लंडन शहरचे बांदखाने भरून गेले. कामन्स यांनी सरकारांत विनंतिपत्र लिहिले की, बंड करणारे लोकांचे चांगले शासन करावें, असे आमचे म नांत आहे. याप्रमाणेच त्यांनी डवेंन्ट्वाटर, निथ्सडेल कान्वथ आणि विंटन एथील अर्ल, लार्ड वोडिंगटन केन्मुर, आणि नेर्न यांवर दोष लागू करून लार्ड विंटन यावांचून सर्वांस मृत्यूचें शासन ठरविले. त्या हतभा- ग्यांचे जीव वाचण्याकरितां किती विनंती झाल्या तरी अमात्यांनी ऐकिल्या नाहींत. लार्ड डर्बेन्ट्वाटर, निथ्सडेल, आणि केन्पुर यांचा शिरच्छेद लागलाच करावा असा हुकूम केला, आणि बा