पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाहीं. आतां तुह्मास क्षमा इतकीच कीं, तुमचा प्राण लागलाच घेतला जाणार नाही. हे ऐकून त्यांनी आपली युद्धाची तयारी बंद केली; आणि त्यांत जे मोठे गृहस्थ व मुख्य सारे होते ते कैद झाले, आणि सरदारांतून किये - कांनीं राजाचें सैन्य सोडिलें ह्मणून त्यांस कोर्टमार्शल याचे हुकुमावरून गोळी घालून मारून टाकिलें. साधा- रण लोकांस चेस्तर आणि लिवर्पूल एथें बंदीस घालून ठेविलें. आणि मनुष्य व कामगार होते त्यांस, या पक्षाचे लोकांस भय दाखवावयाकरितां एकमेकाशीं बांधून लंडन शहरास पाठविलें. इतकें झाल्यावर प्रिटेंडर यास कांहीं आशा राहूं नये; तथापि तशा संकट समयीं स्काट्लंड देशास जावें अशी त्यानें मसलत केली. ह्मणून फ्रान्स देशांतून गुप्तरूपानें येऊन डंकिर्क शहराजवळ एके लाहानसे गलवतावर वसला, आणि थोडे दिवसांत स्काट्लंड देशचे काठांवर येऊन पोंचला. त्याचे बरोबर सारे साहा पुरुष होते. तो असा कोणास न कळत आवर्दीन शहरांतून फेतरेसो शहरास पोंचला; तेथे त्यास अलमार आणि दुसरे प्रति- ष्टित गृहस्थ सुमारें तीस येऊन भेटले. तेथे तो राजा असे जाहीर केले. त्याची प्रतिज्ञा कामर्सी मुकामची छापून प्रसिद्ध केली. गेला, आणि पुढे दोन तेथून तो डंडी शहरास उघडपणे दिवसांनी तो आपले राज्याभिषे चला. काच्या समारंभ करण्याकरितां स्कून शहरास येऊन पों- आपलें येणें निर्विघ्नपणें झालें ह्मणून ईश्वराचा स्तव करावा असा त्यानें हुकूम केला, आणि आपणासाठी ईश्वराची देवळांत प्रार्थना करावयास धर्मपक्ष्यांस आज्ञा