पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेडेपणा. हें तो बोलत असतां, एक गोळी लागून तत्क्षणीं मृत्यु पावला. पुढे इंग्लिश यांनीं तें शहर घेतलें, त्यांत पाहू लागले तो कांहीं नाहीं. यावरून ते अधिक निराश हो- ऊन परत गेले. अशा संकट दशेत राली याचा निश्चय झाला कीं, आतां पुढे आशा करणें हें व्यर्थ; कारण जे त्याच्या हाता- खालीं होते तेच त्यास दुरुत्तरें बोलून तिरस्कारू लागले. इतक्यांत त्यास जवळच्यानीं सांगितले कीं, तू अशी लबाडी केली, याचा जाब व्हावयाकरितां तुला आह्मी इंग्लंड देशास परत नेणार. ही गोष्ट ऐकतांच तो बहुतच भ्याला. असे सांगतात की, त्या वेळेस स्पेन आणि इंग्लंड यांचा तह असतां स्पानिश मुलुखावर जाऊन हल्ला करावा, असा त्यानें बेत आरंभिला; तो फसल्यावर आपण तरी फ्रान्स देशांत पळून जावें. अशी मसलत केली. तीही तडीस गेली नाहीं. असे सर्व उद्योग निष्फळ झाल्यावर त्यास आणि त्याचे बराबर दिले होते त्यांस राजाचे दरवारांत आणून चौकशी केली. स्पेन देशाचा वकील कौंट गां- डिमर ह्मणून त्या वेळेस इंग्लंड यांत होता, त्याने बोलणें लाविलें कीं, तुझी राली यास जावयास ज्या अर्थी आज्ञा दिली त्या अर्थी तुमच्याच मनांत कांहीं लढाईचा बेत होता असे असेल. राजानें खचित सांगितलें कीं, राली यास हुकूम असा होता कीं, स्पानियार्ड यांशीं कज्या किंवा लढाई करूं नये. मग स्पानिश सरकारास आपले हृद्रत पके समजावें याकरितां राजानें राली याचे शिरच्छेद पत्रावर सही केली. तो शिरच्छेद त्या अन्यायाकरितां नव्हे; तर अगोदरचे आरोपाकरितां तो गृहस्थ शेवटीं