पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घालून मारिला जाईल. उत्तर प्रांतांतले बंड यापेक्षा अधिक वाढलें होतें. पुढें अक्टोबर महिन्यांत अर्लड- वेंन्ट्वाटर आणि फार्स्टर साहेब, यांनी घोड्यां- ची मोठी जमात मिळवून लढाई केली; आणि स्काट्लंड देशांतून कित्येक गृहस्थ येऊन मिळाले, ह्मणून त्यांनी प्रिटेंडर राजा असे जाहीर केले. त्यांचे कित्येक साथी न्युक्यास्तिल किल्ल्यांत होते, ह्मणून तो हस्तगत करावयाचा उद्योग प्रथम त्यांनी केला; परंतु तेथील दर- वाजे लागलेले त्यांनी पाहिले, ह्मणून त्यांस हेक्सहम शह- रास परत जावे लागले. यांचे निवारण करावयाकरितां जनरल कापेन्टर ह्मणून सरदारास नऊशे लोक बरोबर देऊन तिकडे पाठविलें, आणि बंडवाल्यांनी केंडाल, व लां- कस्तर या प्रांतांचे वाटेनें प्रेस्तन शहरास जाऊन कांहीं लढाईवांचून ते घेतलें. परंतु त्यांची मसलत पुढे चालली नाहीं, कां कीं, जनरल विल्स ह्मणून कोणी सरदार सात हजार लोक घेऊन त्यांस वेढा घालावयाकरितां त्या शहरावर आला; त्यापासून सुटावायाची त्यांस युक्ति रा हिली नाहीं. याकरितां वाटा बंद करून त्यांनीं तें स्थळ सुरक्षित केलें; आणि शत्रूंचा प्रथम हल्ला माघारें फिरविला. परंतु दुसरे दिवशी विन्स याचे कुमकेस कापेन्टर ह्मणून सरदार होता तो आला; आणि शहरास चहूंकडून वेढा पडला. आपलेच मूर्खपणानें अशा विपत्तीत पडून पुढे फातर यानें पूर्वी धरून बंदीस घातलेला कर्नल आक्स- बरो होता, त्याचे बरोबर एक कर्णेकरी तह कराव यास पाठविला. विल्स यानें हें कबूल केले नाहीं; आ णि सांगितले की, तुह्मां बंडवाल्यांशी मला बोलतां येत इ०स० १७१५