पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ लवकर होण्याचें संधान नाहीं असे पाहून स्वस्थपणीं घरीं गेले. , त्याच वेळेस इंग्लंड देशांतही बंड चालिलें होते; परंतु तें यापेक्षां फार फसलें गेलें. जीमध्यें ड्युक आर्मंड आणि लार्ड बालिंग्ग्रोक हे होते, अशी ही वेडी मसलत प्रिटेंडर यानें पारिस शहरांत केली, ती तेथील इंग्लिश यांचा वकील लार्ड स्तेर यास समजली; आणि त्यानें तें सारें वर्तमान सरकारास लिहून पाठविलें. ती समजतांच ज्यां- विषयीं सरकारचे मनांत शंका होती, असे कित्येक लार्ड आणि इतर गृहस्थ यास धरून कैद केलें. होम विंटीन, किन्ल एथील अर्ल, आणि दुसरे कित्येक यांस एडिंबरो शहरचे किल्ल्यावर टाकिलें. कामन्स सभेची संमति घेऊन राजानें सर विलियम विडम, सर जान पार्कि- ग्तन, हार्वी, कोंब, आणि दुसरे कित्येक यांस धरिलें, लार्ड लान्सडौन, आणि डुप्लिन यांस बंदीस घातलें. सर वि- लियम विडम याचा सासरा ड्युक सामर्सेट हात्याचा, हजीर जामीन होण्यास राजी झाला; परंतु त्याची जामी- नकी कबूल केली नाही. असा सर्व बंदोबस्त झाला अस तांही इंग्लंड देशांतील पश्चिम प्रांतांत बखेडा झाला, परंतु तिकडे कांहीं कावा योजिला ह्मणजे लागलाच तो सरकारांत कळून प्रारंभींच तंटा नाहींसा होत असे. या प्रसंगी आक्सफर्ड शहरांतील युनिवर्सिटी, ह्मणजे सर्व- विद्यालय, याशीं फार कठोरतेने व्यवहार चालिला होता, मेजर जनरल पेपर ह्मणून एक सरदार होता, त्यानें सूर्यो- दयाबरोबर तें शहर घेतलें; आणि जाहीर केले की, जर कोणी शिकणारा आपले शाळेचे बाहेर येईल तर तो गोळी