पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ या प्रयत्नास मार यानें आपले तीनशे आश्रित स्काट्लंड देशचे डोंगर जमीनींत मिळवून, क्यास्तिल् टोन शहरांत प्रिटेंडर यास राजा असे जाहीर केलें; आणि राजाचे सैन्यांतील लेफटेनंट जनरल याचें पद घेतले. मदत करण्याकरितां फ्रान्स देशांतून शस्त्रे, लढाईची ता- मग्री, आणि कित्येक सरदार असे भरून गलबतें आलीं; यांवरून अ यास निरोप आला कीं, प्रिटेंडर खतः लवक- करच येणार आहे. अशे युक्तीकरून दहा हजार फौज जमली. जेव्हां अर्ल याचे बेत ड्युक आर्गेल यास समजले तेव्हां त्यानें शत्रूंचे अर्धीही फौज जवळ नसतां, राजावर आपली भक्ति आहे याची प्रचीति दाखवावयाकरितां डब्लेन शह- रास जाऊन युद्ध करावें असे योजिलें. कितीएक घटिका पर्यंत युद्ध होऊन उभयपक्षोंचीं सैन्यें संध्याकाळी परत गेली, आणि दोघांनीही आपला विजय झाला असें मा- निलें. जरी दोघांतून एकही रणभूमीवर राहिला नाहीं, तरीं या दिवशीं लाभ आणि किर्ति हीं ड्युक आर्गेल या- सच मिळाली. त्यानें शत्रूचे पुढे येणें बंद केलें इतकेंच फार, कारण कीं, कांहीं विलंब लागला असतां केवळ पराज- यच झाला अशी त्यांची स्थिति होती. पुढें उत्तरोत्तर अलमार याचा विशेष नाश होऊं लागल्यामुळे तो फार निराश होऊ लागला. इन्वनेंस किला पूर्वी त्याजवळ होता, तो लार्ड लोवाट यानें राजाच्या स्वाधीन केला, तो लार्ड प्रिटेंडर याचे पक्षाचा आपण चालतों असें दर्शवीत असें. मार्कुइस टलिवादिन याने आपला प्रदेश राखण्याकरितां अ यास सोडून दिले; आणि फार लोक दुसरी लढाई