पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ आणि कुटुंबाची चिन्हें लार्ड यांचे यादींतून काढावी, आणि त्यांचा वित्तविषय सरकाराने जप्त करावा. लार्ड आक्सफर्ड दोन वर्षेपर्यंत कैदेत होता; तित- क्यामध्ये राज्यांत एक बंड चालिलें होतें, तें सिद्धीस गेलें नाहीं; ह्मणून लोकांत धांदल चालली होती. लढाईत कित्येक लार्ड सांपडले, त्यांचा शिरच्छेद झाल्यानंतर प्र जांस युद्धाचा कंटाळा आला, हे समजून आक्सफर्ड याने अर्जी केली कीं, माझी चौकशी करावी. त्याचे ध्यानांत होतें कीं, जे विषय वास्तवीकच अपराधी आणि शासन- योग्य, ते लोकांचे दृष्टीपुढे बहुत आले आहेत; ह्मणून आ पला वृत्तांत त्यापुढे जाऊन इतर अपराध्यांशी बरोबरी क रून पाहिला ह्मणजे केवळ निरपराधीपणाच दिसेल. मग त्याचे मर्जीनेंच एक दिवस नेमिला, आणि दोषारोपाची सिद्धता करण्याविषयीं हुकूम झाला. नेमलेल्या वेळेस लार्ड यांची सभा वेस्तमिन्स्तर वाड्यांत झाली, तेथें लार्ड कौपर, लार्ड हैस्तुअर्ड याचे ठिकाणीं वसला. तेथें आ- क्सफर्ड याची चौकशी कोणते रीतीने करावी याविषयीं लार्ड आणि कामन्स यांमध्ये तंटा पडल्यामुळे त्यास कैदें- तून मुक्त करावें असें लार्ड यांनी ठरविलें. हा बखेडा उत्पन्न झाला ह्मणून त्याची पदवी आणि संपत्ति हीं पूर्ववत् राहिली. त्यांचे आयुष्यास तर कांहीं भय नव्हते; कारण व्यावरचे आरोपास कांहीं प्रमाण नव्हते. त्या वेळेस अशे आग्रही मसलतीपासून लोकांचे मनांत संताप उत्पन्न झाला; कारण कीं, राजाची कृपा होण्याचें द्वार एकपक्षी लोकांवांचून दुसऱ्या सर्वांस झांकले असे झालें. स्काट्लंड देशामध्यें बंडाचा प्रारंभ झाला; अल