पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३१ साहेबानें उत्तर केले की, सत्यत्वांत आपले पेक्षां किंचित्- ही कमी नव्हत, आणि कायद्यांचे माहीतगारींत आपले पेक्षा अधिक; असे या मंडळींत आणि मंडळीचे बाहेर कित्येक गृहस्थ आहेत; या सर्वांची खातर झाली आहे की, या दोषापासून सरकार गुन्हेगारी लागू होते. शेवटी या गोष्टीचा ठराव अर्ल यास विरुद्ध असा झाला; नंतर लार्ड कानिंग्स्बी आणि विग सभासद यांनी मिळून लार्ड याचे सभेत त्यावर दोषारोप ठेविला; आणि विनंती केली कीं, 'त्या सभेतील त्याची जागा काढावी, आणि त्यास कैदेत ठे- वावें. तेथें या गोष्टींच्या विचाराचे वेळेस बहुत आवेशानें वाद झाला. या पदच्युत अमात्याकडे ज्यांची कांहीं प्रीति राहिली होती, त्यांनी आग्रह धरिला की, असे करणें हें फार अयोग्य, आणि यापासून कांहीं अनर्थ होईल. शेवटीं तो अर्ल स्वतः उठला, आणि मोठे शांततेकरून ह्मणाला कीं, माझे कडून तर माझी धनीन जी राणी तिचे आज्ञेव- रून मी सर्वदा वर्तत गेलो, मी कायदा मोडला नाहीं, आणि माझ्या ह्याताऱ्याचे जीवाची चिंता नाहीं. दुसरे दिवशीं त्यास पुढे आणिलें, तेथें त्यास आरोप पत्राची नक्कल देऊन जबाब तयार करण्यास एक महि न्याची मुदत दिली. डाक्कर मीड साहेबानें प्रत्यक्ष सांगि- तलें कीं, अर्ल यास जर किल्यावर पाठविले, तर त्याचे प्राण वाचणे संकट पडेल. असे असतांही सर्भेत निश्चय झाला की, त्यास किल्ल्यावर कैदेत खचित ठेवावें. त्या- वेळेस ड्युक आर्मंड आणि लार्ड बालिंग्ग्रोक यांनी महा- द्वीपांत जाऊन नेमलेले काळांत सभेचे स्वाधीन होगें चु- कविलें, ह्मणून हुकूम झाला कीं, अर्ल याने त्यांची नावें