पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० ल्पोल साहेब यानें सर्व कामन्स सभेस विदित केले की, चौकशी करून एक रिपोर्ट तयार केला आहे; आणि तेव्हांच माथ्यु प्रैअर साहेब, आणि टामस हार्ली साहेब हे दोघे त्या घरांत होते, त्यांस सभेचा हुकूम घेऊन धरि- लें. मग त्यानें लार्ड बालिंब्रोक यावर सरकार गुन्हे- गारीचा आरोप ठेविला. हे पाहून कित्येक सभासदांस आश्चर्य वाटले; परंतु पुढे लार्ड कानिंगस्वी यानें उठून सांगितले, तें ऐकून त्यांस विशेष विस्मय झाला. तो वो- लिला, "वाल्पोल साहेवानें हातावर दोष ठेविला; परंतु मी शिरावर ठेवणार; त्यानें शिष्यास अपराधी ह्मटलें, भी पं- तोजीस ह्मणणार, आक्सफर्ड आणि मार्तिमर एथील अल राबर्ट यावर मी सरकार गुन्हेगारी व दुसरे कांहीं अपराध ठेवणार." लार्ड आक्सफर्ड प्रथम ज्या वेळेस लार्ड सभेत आला, तेव्हां याजवळ कोणी जाईना. कामन्स सभेत जेव्हां त्याचे दोषांची कलमें वाचिलीं, तेव्हां तुर्ने शहर डच लोकांपासून कसे घ्यावें, ही मसलत त्यानें फ्रेंच राजास सांगितली, या कलमावर मोठा वाद झाला. वाल्पोल साहेबाचें ह्मणणे पडलें कीं, तो सरकार गुन्हेगारी झाली. परंतु सर जोझेफ जेकिल ह्मणून एक विग होता त्यानें ह्मटले की, या कलमावरून त्याचे आंगी सरकार गुन्हेगा- री ठरत्ये, असे माझे बुद्धीत येत नाहीं. तो ह्मणाला की, माझे लक्ष्य लहान मोठे मनुष्यांचा न्याय होण्याकडे आहे; आणि राज्यांतील कायदेही मी थोडेसे जाणतों. त्यावरून हा दोष सरकारी गुन्हेगारी इतका नाहीं, असें ह्मणावयास मला शंका वाटत नाहीं. यावर मोठे क्रोधेंकरून वाल्पोल