पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ राजा असतो, असें न समजून त्याने सर्व टोरी कामगारांस दूर केलें; आणि त्यांचे जागेवर विग लोकांस नेमिलें. अशा पक्षपातेंकरून लोकांत असंतोष उत्पन्न झाला; आणि ते ह्मणूं लागले कीं, धर्माविषयीं भय झाले आहे. ब- र्मिंगम, ब्रिस्तल, नारिच आणि रीडिंग या शहरांनी पूर्वी साशेवरेल याचा पक्ष धरिला होता, त्याचे स्मरण त्यांस झालें; आणि ह्मणूं लागले कीं, विंग लोक दूर अ सावे; आणि साशेवरेल याचा विजय असावा. पुढे नवे पार्लमेंट सभेस बोलावणें केलें, तिचे प्रथमचे बैठकीस विग लोकांचे प्राबल्य झाल्यामुळे पूर्वीचे प्रधानां- वर बहुत जुलूम होऊं लागले. लार्ड यांनी अर्जी केली की, महा द्वीपांत राज्याची फार अपकीर्ति झाली आहे, ती जावी. कायन्स यांनी निश्चय ठरविला कीं, देशाची इतकी खराबी कोणत्या कृत्यांही झाली, याचा शोध ला- वावा, आणि प्रिटेंडर याचे पक्षपात्यांचें शासन करावें. या आणि पुढील राज्यामध्यें एक युक्ति अशी निघाली होती कीं, जे सरकारास विरुद्ध बोलतील त्यांस पेपिस्त आणि जाकोबैट असे ह्मणावें. सरकारची कृत्ये जुलुम गारीचीं, असें ह्मणणारे जे होते, त्यांस प्रिंटेंडर यास रा ज्यपदावर स्थापण्याची इच्छा आहे असे ठरविले; त्या भयानें ती गोष्ट कोणी कांहीं बोलेनात, असे झाले. नंतर एकवीस पुरुषांची मंडळी नेमून त्यांस काम सां- गितलें कीं, नुकताच जो तह झाला, त्यासंबंधी सर्वकागद पत्र पाहून त्यांतून पूर्वील प्रधानांवर दोष लागू होईल, असे जे असतील, ते निवडून काढावे. या कामाचे चौ- कशींत कांहीं वेळ गेल्यानंतर, त्या मंडळींतील मुख्य वा-