पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ काम कारभार करणे, हे त्यामध्ये गुण होते. त्यांमध्ये इतका दोष होता की, त्याचें लक्ष्य इंग्लिश लोकांपेक्षां आपले पहिले प्रजांकडे फार होतें. राणीचा श्वास नाहींसा होतांच प्रिविकौन्सिल याची सभा झाली, तेथें इलेक्टर याच्या तीन सनदा त्यांस जाहीर झाल्या; यांवरून त्याचे पक्षाचे लोकांतून सातांस लार्ड जस्तिन हा किताब देऊन राज्यांतील मोठा कारभार सांगितला. नंतर लवकरच हुकूम झाला कीं, जार्ज राजा झाला ह्मणून इंग्लंड, स्काटलंड, आणि अयर्लंड या तीन देशांत जाहीर करावें. जार्ज यांस ती बातमी सांगून इंग्लंड देशांत घेऊन येण्याकरितां अल डार्सेट यास नेमिलें; आपले मकाणांवर विश्वासू सरदार पाठविले; पोर्ट्समौथ शहरांतील फौज वाढविली; आणि आडिसन साहेबास सेक्रेतारी नेमिलें. पूर्वीचे प्रधानाचा अधिक अपमान करावयाकरितां लार्ड बालिंब्रोक यास आपले कागदांचें पुडकें घेऊन बाहेर चाकर लोकांमध्यें उभे राहावे लागे. नवा राजा होण्यांत कांहीं बखेडा झाला नाही. यावरून स्पष्ट आहे कीं, तो राजा नसावा ह्मणून कोणी कांही मसलत केली नव्हती. जेव्हां तो जाहाजांतून ग्रीनिच शहरांत उतरला, ते- व्हां राजाचे रखवालीकडे, डयुक नथेंबर्लंड, आणि लार्ड जस्तिस, यांनी मोठे आदरानें त्याची भेट घेतली. ज्यांनीं त्याचा पक्ष फार धरिला होता, त्यांस त्यानें वोलावून आणिलें; परंतु ड्युक आमंड, लार्ड चान्सेलर, आणि लार्ड त्रेझुरर हे त्यांमध्ये नव्हते. पक्षपाती राजा अर्धे मुलुखाचा मात्र