पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२७ भर तसीच बेशुद्ध होती; आणि दुसरे दिवशी सकाळी मृत्यु पावली. तेव्हां तिचें वय एकुणपन्नास वर्षांचे होते. जे लोक त्या समयीं फार ज्ञानी, धनवान्, आणि शूर होत चालिले होते, त्यांवर या राणीनें बारा वर्षेपर्यंत राज्य केलें. प्रकरण ३४. प्रथम जार्ज राजाची कथा.. संन् १७१४ पासून १७२७ पर्यंत. पुढे कोण राजा व्हावा याविषयीं जो राज्य कायदा ठरला होता, त्याप्रमाणें, ब्रन्स्विक प्रांताचा प्रथम इलेक्टर अर्नेस्त अगसटस, आणि प्रथम जेम्स राजाची नात सौ- फेआ नामें होती, या दोघांचा पुत्र, प्रथम जार्ज राजा सिंहासनारूढ झाला, त्या वेळेस त्याचे वय चौपन्न वर्षांचें, बुद्धि सूक्ष्म, अनुभव बहुत, स्नेही पुष्कळ, आणि युरोप देशांत सर्वत्र स्वास्थ्य, या गोष्टी त्याचा स्वार्थ सिद्ध होण्यास उपयोगी पडल्या. त्याचे गुण दिसण्यांत असाधारण नव्हते, परंतु उपयोगी होते; आणि त्याचा स्वभाव त्याचे पूर्वीचे अधिकारी स्तुअर्ट वंशाचे राजे, यांचे स्वभावाहून वेगळा होता, पूर्व राजे आपले आश्रितांस विपत्तिसमयीं सोडितात, अशी प्रसिद्धि झाली होती; परंतु जार्ज राजा इंग्लंड देशांत आल्यानंतर लोकांजवळ स्पष्ट सांगू लागला कीं, "माझा नियम हा कीं, मित्रांस अंतर देऊं नये; सर्व जनांचें न्यायें- करून प्रतिपालन करावें; आणि कोणाचें भय बाळगूं नये," या रीतीचा निश्चय, स्थिर प्रतिज्ञता, आणि चित्त देऊन १२