पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिचे दुखणे अधिकच वाढत चालिलें, ते असे की, तिचे आयुष्याची निराशा होऊन तिचे प्रधान एकत्र जमा झाले. सर्व राज्यांतून सभासदांस बोलावून आणिलें, आणि ते राज्यरीतीस विघ्र होऊं नये; ह्मणून युक्ति योजूं लागले, त्यांनी हानोवर देशचा इलेक्टर यास पत्र पाठविलें कीं, राणीची अवस्था कठीण दिसती, तर आपण निघून हालंड देशास यावें, तेथून आपणास इंग्लंड देशांत आणावयाक रितां आरमाराची तयारी असेल. त्याच वेळेस त्यांनी हेग शहरांत अर्ल स्त्राफर्ड यास हुकूम पाठविला की, प्राते- स्तंट मताचा राजा पुढे व्हावा, असा बंदोबस्त झाला आहे, त्याचें संरक्षण करावयास डच सरकाराकडून तयारी असा वी. प्रधानांनीं समुद्रकांठचीं बंदरें संभाळण्याविषयीं योजना केली, आणि आरमाराचें काम अर्ल बर्कली ह्मणून विग होता त्यास सांगितले. या सर्व कामाचे परिणाम दोन झाले. एक विग लोकांवर नवे राजाची प्रीति फार झाली, आणि दुसरे असें कीं, विरुद्ध पक्षापासून राज्याची खराबी होईल असेही भय वाटलें. . संन् १७१४ त जुलै महिन्याचे तिसावे तारिखेस रा. णीला औषधांनीं कांहीं गुण पडून ती सकाळी चार घटि- का दिवसास पलंगावरून उठून कांहीं इकडे तिकडे चा लली. काही वेळानंतर खोलींत एक घड्याळ होतें, त्याकडे कांहीं वेळपर्यंत पाहात राहिली. जवळ बायका होत्या, त्यांतून एकीनें विचारिलें की, आपण आज नेहमीचे पेक्षां फार वेळ काय पाहातां ? तिच्यानें यावर कांही उत्तर कर बलें नाहीं; आणि तिनें मरण समयीचे दृष्टीनें तिजकडे पाहिलें. तिची शुद्धि अकस्मात् गेली, व ती सारे रात्र-