पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्वेष केला, त्यांचे मनांत त्या विद्वान् योड्याची दया आली; तो स्वतः मुक्तता व्हावयासाठी प्रयत्न करीत होता. या- करितां त्यांनें अशी बातमी उठविली कीं, गायना देशांत सोन्याची खाण आहे, ती मी दाखवितों; ती सांपडली अ सतां जे त्या कामास जातील, त्यांस आणि सान्या प्रजेस बहुत संपत्तीचा लाभ होईल. राजास ती गोष्ट खरी वाटली असेल किंवा त्याचे मनांत त्याची विशेष फजीती करावी असे असेल; परंतु इतकें खरें की, त्याने त्यास जाऊन सोन्याचा शोध करावा अशी आज्ञा केली. तथापि त्यानें प्रतिबंधांतच असावें, असे पूर्वी जें त्यास शासन ठरविले होते, तें ततेंच काइम राखिलें. राली यास त्या कामाची सिद्धता करावयास फार दिवस लागले नाहीत. त्यानें लगबगीनें सर्व तयारी केली. यावरून बहुत लोक तर्क करितात की, त्यानें जी आवई उठविली होती, ती त्याच्या मनांत वास्तवीक वा- टली होती; मग तो गयाना देशास गेला, आणि आपण मोठमोठीं पांच गलबतें घेऊन ओरूनोको नदी जेथें समुद्रास मिळाली आहे तेथें राहिला. बाकीची जहाजे, आपला मुलगा, आणि क्यापटन केनीस या दोघांचे स्वा- धीन करून त्यांस नदीचे प्रवाहांतून पाठविलें. तेथें जा- ऊन पहातात तो सोन्याचें नांव देखील नाहीं. इतका अनर्थ मात्र झाला कीं, स्पानियर्ड लोक तेथे होते, ते हे आल्याची बातमी समजल्यावरून, लढाईस सिद्ध झाले. पुढे त्यांस धीर यावयाकरितां राली याचा मुलगा ह्मणूं लागला की, आपण सेंट टामस शहराजवळ जात आहों, हाच कांहीं वास्तवीक निधी नव्हे ? दुसन्याची आशा करणे हा