पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२५ संपति होण्यास वेळ नेमिला. या रीतीने सर्व युरोप देश एक सर्वसत्ताक राज्यासारिखा झाला, ज्यांतील वेगवेगळे प्रदेशांत भिन्नभिन्न अंमलदार राज्य करीत आहेत, आणि एक संस्थानाने लोभादि केली असता, त्या सर्वांजवळ त्या- चा जावसाल करणें प्राप्त व्हावे असे सर्व जगास जें योग्य तें इंग्लिश अमात्यांनी केले; परंतु त्यांस जें योग्य तें लोकांनी केले नाही. विग लोक टोरी प्रधानांस वाहेरून उपद्रव करीत असतां, त्यामध्ये आंतले आंत कलह उत्पन्न झाल्यामुळे प्रारंभी लार्ड आक्सफर्ड त्यांचा बहुत नाश झाला. आणि लार्ड बालिंग्ग्रोक या दोघांची बुद्धि आणि वेत, हीं एक होतीं; परंतु पुढे ते आपले दुसरे वैयांचे नाशकरून आपले हिताकरितां वेगवेगळे विचार आणि उद्योग करूं लागले. आक्सफर्ड जें जें करी तें तें समजुतीने आणि विचारानें करी. इकडे बालिंब्रोक सर्व गोष्टी धीरानें करीत असे. हानोवर वंशांतले कोणास तरी राज्याधिकार असावा, असा आक्सफर्ड यास अभिमान होता, आणि वालिब्रेोक याचे मनांत होतें कीं, प्रिटेंडर याचा आंत प्रवेश व्हावा. त्या दोघांचे मनापासून एकमेकाचा अति- शय द्वेष होता, परंतु त्यांचे स्नेहीव आश्रित यांचे उद्योगें- करून कांही दिवसपर्यंत तो उघड दिसून आला नाहीं. असें वर्तमान पाहून टोरी लोकांस आणि राणीस फार दुःख झाले; कारण कीं, तिचे प्रीतींतले अमाय दुर्बळ होत चालिले. आणि तिची शरीर प्रकृति ही केवळ क्षीण झाली. मनांतील चिंतेनें फार अशक्त होऊन शेवटीं तिची शुद्धि गेल्यासारिखें झालें. वैद्यांनीं बहुत औषधे दिली; परंतु