पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ तिसरा करार असा की, सावोय प्रांताचा ड्युक यानें राज पद धारण करून, सिसिली बेट, फेनेस्त्रेल, व दुसरे कित्येक स्थळींचा अंमल चालवावा. हा सारा मुलूख बहुत- करून फ्रेंच राज्याची कमतीकरून काढलेला होता. डच लोक फार दिवसांपासून जो राज्याची सीमा इच्छीत होते, ती त्यांस मिळाली; जसे सावोय प्रांताचा ड्युक याचे हित करण्याविषयी फ्रेंच राज्यांतून कांहीं घेतले; तसेच डच लोकांची भरती करण्याकरितां आस्त्रिया मुलखांतून लांडर्स प्रांतांतली जीं फार वळकट शहरें होतीं ती दिली. इंग्लंड देशची प्रतिष्ठा व हित या दोहोंचेंही चांगले संर- क्षण केलें. डंकिर्क ह्मणून एक शहरांत किला आहे, त्या- पासून इंग्लिश यांस युद्धसमयीं अडचण पडत असे, ह्मणून तो काढावा आणि बंदर मोडावें असा हुकूम केला. जिवा- ल्टर शहर आणि मिनोर्का वेट, या दोहोविषयीं स्पेन देशचे दरबारानें सर्व दावा सोडिला. हड्सनबे, नोवास्कोशिया, आणि न्युफौंडलांड, या स्थळांबावद, फ्रेंच सरकारानेही दावा सोडिला; परंतु त्यांजवळ केपब्रिटन राहिले, आणि त्याचे कांठावर मासे वाळविण्याची मोकळीक त्यांस मिळाली. फ्रेंच लोकांमध्ये जे प्रातेस्तंट होते त्यांस बंधांत ठेविलें होतें, त्यांस इंग्लिश यांनीं सोडविलें, या गोष्टीवरून इंग्लिश यांची बहुत कीर्ति झाली. जर्मनी देशचा एंपरर यानें नेपल्स, मिलन, आणि नेथर्लंड प्रांतांतील स्थानिश लो- कांचा हिंसा इतका मुलूख द्यावा; व प्रुशिया देशचे रा जानें अपर (वरील) गेल्डर प्रांताचें राज्य करावे, असा करार केला. एंपरर यानें कांहीं वेळपर्यंत तो करार आग्रहाने मान्य केला नव्हता, ह्मणून या कलमांस त्याची