पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२३ ज्यांस मात्र तहाचे वास्तविक अगत्य होतें, ह्मणून दुसऱ्या संस्थानाचे वकील नवे नवे तंटे मात्र उत्पन्न करीत; या- करितां इंग्लिश अमात्य फ्रान्स राज्याशीं गुप्त बंदोबस्त करूं लागले. मग एकमेकाचे युक्तीनें असा तह योजिला की, जेणेकरून ब्रिटन बेटांतील लोकांचें कांहीं विशेष हित होईल. १७५२ आगस्ट महिन्याचे प्रारंभी सेक्रेतारी सिंजिन, ज्यास लार्ड वैकौंट बालिंग्ोक अशी पदवी मिळाली होती, इ०स० व्यास पूर्वी तहनाम्यास जीं झालीं होतीं तीं दूर करण्याकरितां, वेर्सेल शहरचे दरवारास पाठविले. त्याचे बरोबर प्रैअर साहेब आणि आबीगाल्टियर हे दोघे होते. तो गेला तेव्हां मोठे सत्कारानें भेट झाली. फ्रेंच राजा व मार्कुइस डीटोर्सी हे दोघे त्यावर बहुत प्रीति करीत असत; त्यांचे बरोबर त्यानें सावोय प्रातांचा ड्युक आणि बवेरिया प्रातांचा इलेक्टर यांचा बंदोबस्त केला. शे- वटीं उभय पक्षींचे मुखत्यार वकिलांनी व्यापाराचा आणि स्नेहाचा तह ठरविला, आणि राणीनेंही तो आपण मा- न्यकरून पार्लमेंट सभेस तें वर्तमान कळविलें. • या प्रसिद्ध तह नाम्यांतले मुख्य कलम हे होते की, फ्रान्स आणि स्पेन हीं दोन प्रबळ राज्ये एकाचे हाता- खालीं आलीं, ह्मणजे युरोप देशचे स्वातंत्र्यास भय, ह्मणून स्पेन देशचा राजा फिलिप यानें फ्रान्स देशचे राज्या- विषयींचा सर्व दावा सोडून द्यावा. असे ठरले की, बेरी एथील ड्युक फिलिप याचा भाऊ, ज्यास त्यानंतर राज्य कर ण्याचा अधिकार होता, तो फ्रान्स देशचें स्वामित्व पावला असतां, त्याने स्पेन देशचे धनीपणाविषयीं सत्ता करूं नये.