पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ बोलण्याकरितां फ्रान्स देशास पाठविले. त्याचे बरोबर कोणी साधारण पुरुष मिनाजर ह्मणून होता, तो फ्रान्स देशांतून तह करावयास लंडन शहरास आला; परंतु उभयपक्षींचे मंत्री जे त्या कामाविषयीं होते, त्या सर्वांचे संमतास येई असा तहनामा करणे मोठे कठीण पडलें. अर्ल स्वाफर्ड पूर्वी हेग शहरांत वकील असे, त्यास नुक- तेच बोलावून आणिलें होतें; त्यास हालंड देशांत परत पाठविलें, आणि हुकूम दिला की, त्या देशचा पेन्शनारी हेन्श्यस यास तहाचा मूळ विचार जाहीर करावा, तो राणीच्या मनास आला आहे, असे कळवावे, आणि वकि लांनी कोठें मिळावे हे ठरवावें. तो विचार डच लोकांस पसंत पडला नाही, ह्मणून तो रद्द करावयास त्यांनीं राणी- जवळ वकील पाठविले, परंतु राणी कबूल झाली नाहीं. ह्मणून शेवटीं वकिलांनी एकत्र मिळावयाचे ठिकाण यु- त्रेक्ट शहर ठरविलें; आणि फ्रेंच अमात्यांस तेथे येण्या- च्या परमाणगीचिठ्याही दिल्या. गला. पुढे सुत्रेक्ट शहरांत तह नाम्याचा ठराव होऊं ला- तेथें लार्ड प्रिविसील, व ब्रिस्तल एथील बिशप राबिन्सन, आणि अर्ल स्त्राफर्ड, हे इंग्लिश यांकडचे बुईस आणि वादर्सेन, हे डच लोकांकडचे; आणि फ्रेंच पक्षाचे मार्शाल डुक्सेलस, क्यार्डेिनल पोलिन्यक, आ- णि मिनाजर साहेब, हे तिघे जर्मनी देशचा एंपरर याने आणि सावोई देशचे वकील यांनी तो तहनामा करण्यास मदत केली; त्या वेळेस दुसरे सामील राज्यांतून ही मुख्यार वकील पाठविले, परंतु तह करणे त्यांच्या मनापासून नव्हते. इंग्लंड आणि फ्रान्स या दोन रा