पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११९ हेग शहरांत ड्युक होल्स्तैन, याचा वकील पेट्कम म णून होता, त्यास राजाने हे काम सांगितले, आणि एकांती ड्युक याशी आपण बोलिला. शेवटी गेत्रुडिन्बर्ग गावांत ठराव होण्याचा आरंभ झाला. त्यामध्ये मुख्य मार्लबरो, युतीन, आणि झिझेदर्फ, या तिघांस तहाची इच्छा नव्हती, ह्मणून फ्रेंच अमात्य लोकांचे मतलव सिद्धीस जाईनात. त्यांचे वर्तमानाची चौकशी करण्याकरितां गुप्त पुरुष ठे- विले, त्यांचे धन्याचा अपमान केला, पत्रे कोंडिलीं, ह्मणून दुसरी लढाई करण्याचा लुइस राजाने निश्चय केला. कांही दिवसांपासून प्रधानमंडळी राणीस अमान्य झा- ली होती; परंतु एकाएकी त्यांस निरोप द्यावयाचा धीर होईना. हालीं ह्मणून होता, त्यावर तिचा विश्वास होता; तो तिला सांगे कीं, आपण योजिले आहे, असे केले तर लोक बरें ह्मणतील, ती गोष्टही खरीच आहे, आणि केली असतां चिंता नाहीं. मग त्याचे मसलतीवरून तिनें अद- लावदल करावयास आरंभ केला. लाई चेंबर्लिन याचा अधिकार ड्युक केंट याजवळ होता, तो काढून ड्युक भू- स्वरी यास दिला; कारण कीं, तो टोरी यांचा पक्ष धरून हाली याशी व्यवहार ठेवीत होता. पुढे लवकरच सर कारचा सेक्रेतारी अल मंडलैंड, डयुक मार्ल्बरो याचा जांवई, याचें काम काढून अर्ल डामौथ यास दिले. अर्ल गोडोल्फिन यासही कामावरून दूर केलें, आणि जामदारखान्याचे कामावर दुसरे कितीएक गृहस्थ नेमिले. त्यांत मुख्य हार्ली साहेब केला. त्यास मुख्य प्रधानाचेही काम सांगितलें, आणि जामदाराचा मदतनीस केला. लाई सोमर्स याचे जागेवर अल राचेस्तर यास