पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० नैमिलें. लार्ड स्ल्युअर्ड याचें काम ड्युक डेवनशैर याजव ळून घेऊन ड्युक बकिंगम यास दिलें; आणि हेनरी सिंजिन साहेबास जागा देण्याकरितां वोय्ल साहेवास से- क्रेतारी याचे कामावरून निरोप दिला. लार्ड चान्सेलर यानें राज्याचा शिका खेच्छेनें सोडून दिला; तो प्रथम कितीएक गृहस्थांचे स्वाधीन ठेवून मग सर सैमन हा- र्कर्ट याजवळ दिला. अर्ल बार्टन यानें अयर्लंड एथील लार्ड लेफ्टेनंट याचे काम सोडिलें, तें ड्युक आमंड यास दिलें. रावर्ट वाल्पोल साहेबाचे, लढाई खात्याचे दप्तरांतील सेक्रेतारी याचे जागेवर, जार्ज ग्रान्तिल साहेबास ठेविलें. सारांश, ड्युक मार्लबरो यावांचून कोणी एकही विग कामावर राहिला नाहीं. या रोतीचीं राणीचीं कृत्यें पार्लमेंट सभेस मान्य हो ईत तंवपर्यंत तिचा विजय पूर्ण झाला नाहीं. मग रा- णीने आपले भाषणांत जाणवले कीं, युद्ध पुढे चालवावें हें बरें. पार्लमेंट सभेनें मोठ्या उत्साहाने आणि सर्व संम तानें त्या गोष्टीस रुकार दिला. त्यांनी मसलत सांगितली कीं, आलीकडे तुझ्या राजसत्तेस व प्रतिष्ठेस विकार जे व्यवहार झाले आहेत, ते बंद करावें. पुढें ड्युक भा लेवरो याची काही महिन्याचे पूर्वी बहुत स्तुति व प्रतिष्ठा करीत होते, तो आतां द्वेष आणि निंदा यांस पात्र झाला. तो लोभी फार ह्मणून त्यानें लढाई पुढे चालविली, असें बोलू लागले. त्याचें कृत्रिम आणि द्वेष यांच्या जेथें तेथें प्रचीति येऊं लागल्या, हीं वर्तमानें खरीं असतील; परंतु पक्षपाती बोलण्यावर भरवसा नाहीं; कारण की, त्याचें शौर्य व योग्यता यांविषयींही संशय निघूं लागले. ड्युक