पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ लिहून दिले असेल. तो बोलिला कीं, राणीविषयी किंवा राज्याविषयों माझे मनांत कांहीं वांकडे नव्हते; राज्यामध्ये मोठी गडबड होऊन पुनः नूतन धर्माच्या पक्षाचा राजा राज्य करूं लागला, हे फार चांगले झाले, असे त्याने ह्म- टलें. मी ज्या धर्मांत वागलों त्यांत आहे कीं, राजाचा हुकूम कसा असला तरी तो मानावा, असे तो बोलिला; आणि श्रोत्यांस ऐकून दया यावी, या रीतीनें त्या भाषणाची त्यानें समाप्ति केली. शेवटी सत्रा संमति अधिक पडून त्यावर गुन्हेगारी ठरली; परंतु या ठरावावर चवतीस लार्ड यांनी दप्तरामध्ये लिहून ठेविलें कीं, आह्मी यास मान्य ना- हीं. त्यानें तीन वर्षेपर्यंत देवळांत उपदेश करूं नये, आणि त्याचे दोन ग्रंथ लार्ड मेयर व दोघे शेरीफ यांचे देखत फांशीं देणाराने जाळावे, असा हुकूम केला. हे शासन फार लाहान केले, याचे कारण कीं, लोक अकस्मात् आवेशानें अविचार करितील असे भय होतें. पुढे राणीनें जुन्या सभेस निरोप देऊन नव्या सभेस बोलावणे केले, आणि तिला स्वतः टोरी लोकांचा अभिमान होता; ह्मणून तिने लोकांस आपले प्रतिनिधि विचारपूर्वक नेमावयास अवकाश दिला. न • जे विग लोकांचा द्वेष करीत होते, त्यां- वांचून दुसरे कोणी नेमिले नाहींत. त्या काळी फ्लांडर्स देशांत चांगले प्रकारें युद्ध चालिले होते. ड्युक मार्ल्बरो तेथील सरदार, यास युद्धाचे मोठे अगत्य होते; कारण की, त्या लढाईपासून त्यास प्रतिष्ठा, व द्रव्यलाभ हीं दोन मिळावयाची होती. लोभाखाली त्याचे सारे गुण झांकले गेले होते. फ्रान्स देशचे राजास तहाचें अगत्य होतें, ह्मणून तो ठराव होण्याचा प्रयत्न करीत असे.