पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११७ सत. त्यांतून कित्येक त्याचा उघड जयजयकार करीत, आणि कित्येक त्याची इच्छा पूर्ण व्हावी, असे मनांत चिंतन करीत. कामन्स यांचे तर्फेचे कामगार सर जोझेफे जे- कील, अयर साहेब, सालिसिटर जनरल, सर पीटर किंग, रिकार्डर, जनरल स्तान्होप, सर टामस पार्कर आणि वाल्पोल इतके साहेब होते. त्या धर्मपक्ष्याचे तर्फेनें बोलणारे सर सैमन हा कोर्ट आणि फिप्स साहेव हे दो- घे; आणि त्यांस डाक्कर आटर्बरी, डाक्तर स्मारिज, आणि डाक्तर फ्रेंड यांचीही मदत होती. ती चौक- शी चालत असे, त्या वेळेस लोक बहुत दांडगाई आणि ग डबड करीत. ते राणीचे पालखीभोंवते जाऊन ह्मणाले, “ईश्वर, राणी आणि धर्मपक्ष यांचें कल्याण करो; आह्मी इच्छितो की, राणीने डाक्तर साशेवरल याचा पक्ष धरा- वा,” त्यांनी डिसेंटर यांची कितीएक देवळे मोडलीं, आ- णि कितीएक घरें लुटलीं, आणि मोठे पेढीवर जाऊन ह ला करावा असा बेत केला. याकरितां कामन्स याचे सांगण्यावरून राणीनें तो तंटा बंद करावयाकरितां जाहि- रात लाविली. मग कित्येक सांपडले त्यांस सरकार गुन्हे - गार ठरवून चौकशी केली. दोघांवर अपराध काईम क रून त्यांस मारण्याचे शासन ठरविलें, परंतु ते दोघांतून एकासही घडलें नाहीं. कायन्स यांनी अपराधपत्र वाचल्यावर साशेवरल याचे पक्षाचे लोकांनी मोठ्या युक्तीने त्यास अनुकूळ उत्तर दे- नंतर त्यानें स्वतः भाषण केले; त्या- ण्याचा प्रारंभ केला. मध्ये व त्याचे धर्मविषयक वादांमध्ये फार अंतर दृष्टीस येतें, यावरून अनुमान होतें कीं, तें भाषण त्यास दुसरे कोणी