पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयत्न करीत नाहींत. हें हलके भाषण सर साभ्युएल जेरार्ड, लार्ड मेयर होता, त्यानें मान्य करून प्रसिद्ध क रण्याविषयीं साहित्य केलें; आणि टोरी लोकांनी याची फार स्तुति केली. , यार्क एथील आर्चबिशप याचा मुलगा डोल्बीन सा- हेब होता, त्यानें या वेडे गोष्टीकरितां कामन्स सर्भेत फि- र्याद केली; आणि जी गोष्ट सहज लक्ष्यांतून गेली असती, ती या रितीनें बळकट केली; तींतील अतिशय आग्रहाचे भाग होते ते वाचले; आणि ते फार निंदक आणि खोटे असे ठरविलें. साशेवरल यास बोलावून आणिलें, तेव्हां त्यानें तें आपण लिहिलें याविषयों नाकबूल न होता त्या कर्माचे भूषण मानिलें; आणि तें प्रसिद्ध करावयास लार्ड मेयर यानें जें साहित्य केले होतें तें सांगितलें, तोही तेव्हां तेथेंच होता. नंतर त्यास एकीकडे घालवून देऊन ठर विलें कीं, लार्ड यांचे सर्भेत त्यास नेऊन त्यावर मोठे गुन्हे व लबाड्या यांचा आरोप ठेवावा; आणि इंग्लंड देशांतील कामन्स यांचे तर्फेचें बोलणें डोल्बीन साहेबानें बोलावें. त्या अपराधाचे कलमांची याद करावयाकरितां आपणांतून कांहीं गृहस्थांची मंडळी योजिली; साशेवरल यास धरून कैद केलें; आणि वेस्तमिन्स्तर हौस यांत लार्ड यांचे स मक्ष त्याची चौकशी करावयाकरितां दिवस नेमिला. सारे राज्याचे डोळे या चौकशीवर लागले होते. ती चौकशी एकवीस दिवसपर्यंत चालली होती, आणि तंव- पावेतों सर्व सरकारी काम बंद पडलें होतें. प्रतिदिवशीं उगीच पाहाण्याकरितां राणी स्वतः तेथें जात असे; आणि तो वाड्यांतून जाई त्या वेळेस बहुत लोक त्याचे बरोबर अ