पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. ८ ल्यांत सर टामस ओबर्बरी ह्मणून एक गृहस्थ होता, त्यास विष घालून मारिलें, असा त्यावर आरोप आल्यामुळे राजाची त्यावर गैरमर्जी झाली ह्मणून त्याची दरबारांतून उठावणी होऊन जन्मभर पश्चात्ताप करितां करितां शेवटीं मरण पावला. राजाने दुसरा एक पुरुष जेव्हां आपला इष्ट केला, तेव्हां तो पहिला मित्र सुटला. त्याचें नांव जार्ज विलियर्स, त्याचे वयास एकवीस वर्षे होतीं. त्याचे घरांत सर्वांमध्ये तो धाकटा होता. तो देशाटन करून आल्यावर साम सेंट याचे शत्रूनी युक्तीनें राजाजवळ त्याचा प्रवेश केला; मनांत की, त्याचे स्वरूप आणि गुण पाहून राजाची यावर प्रीति बसावी. अशा बेताने एक नाटक करून राजाचे चांगला नजरेस येई असे त्यास बसविलें; राजा त्यास पा हून फार मोहित झाला; तो इतका की, पुढे थोडे वर्षांनंतर त्यानें अनुक्रमानें त्यास सर्व पदें देऊन शेवटी मुख्य नौका- ध्यक्ष केलें. अशी वेडी प्रीति पाहून लोक मनांत कुरकुरूं लागले. ती कुरकुर विशेष वाढावयास कारण झाले, तें सांगतो. हे पुढील दुष्टकर्म या राजाचे राज्यांत घडले हा त्यास मोठा कलंक लागला. शूर, तसाच विद्वान, राली ह्मणून एक गृहस्थ होता, त्याजवर कांहीं बंडाचा आरोप ठेविला होता. त्या संकटावस्थेत असतांही त्याने जे कितीएक ग्रंथ लिहिले ते आजचे दिवशींही प्रशंसा करावयाजोगे आहेत, त्यानें बहुत दिवस दुःख भोगिलें; आणि त्यामध्ये कविताशक्ति फार चांगली होती. ते पाहून लोकांचे मन याकडे विशेष लागले. ज्यांनी एसेक्स याचे शत्रूचा V