पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ त्या समयी उत्तरोत्तर विग प्रधानाचा अधिकार कमी होत चालिला. डचेस मार्लबरो ईनें राणीजवळ कित्येक स्त्रिया ठेवून दिल्या होत्या; त्यांत एक तिचे नात्याची मिस्त्रेस मार्शम ह्मणून असे, जीस तिनें हलके पदवोपा- सून आणि गरीबीपासून उंच पदवीस चढविली होती, रा णीवर आपला किंचित् अंमल बसला, असे पाहून ती ड- चेस गर्वानें उन्मत्त झाली; आणि ती ज्या गुणेकरून श्रेष्ठ पद पावली होती, ते सोडून देऊं लागली. मिस्त्रेस मा- शम इला पुढे अर्थ संपादन करावयाचा होता. ह्मणून ती विशेष नम्रतेनें व लक्ष्य देऊन राणीशों व्यवहार करीत असे, राणीची खुशामत करी, आणि तिचे गैर समजुती सही मान देई. टोरी लोकांचे मत राणीस मान्य होते, असे पाहून तिनेही तसेच मत दाखविलें. हाल साहेब ह्मणून त्यावेळेस सरकारचा सेक्रेतारी होता, त्याचें ती कार्य सा- धावयाचें द्वार होतें. तोही पूर्वी कांही दिवसपर्यंत राणी- ची कृपा पावला होता; त्यानें निश्चय केला कीं, विग अ मात्यांचा विश्वास बुडवावा. त्याच्या मनांत होतें कीं, टोरी पक्ष आपले हाताखालीं घ्यावा, आणि विग पक्ष कारभारां- तून काढावा. असें ठरवून त्यानें हेनरी सिंजिन ह्मणून एके पुरुषास सोबती केला, ज्यास पुढे काही दिवसांनी लार्ड बॉलिंग्ोक असा किताब मिळाला. तो पुरुष मोठा वक्ता, लोभी, साहसी, चपल, उद्योगी, आणि आग्रही होता. त्यामध्ये कांहीं चातुर्य असे, पण विश्वासुपणा नव्हता. या मंडळींत तिसरा सर सेमन हार्ट ह्मणून मोठा बुद्धिमान असा एक वकीलही होता. पूर्वी लोकांस विग पक्षपाती प्रधानाचा अभिमान होता,