पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ शचे पार्लमेंट सभेत होत असत; आणि इंग्लिश पार्लमेंट समेत असा विचार केला होता कीं, या रीतीनें तो सामर्थ्य - वान् आणि भयंकर देश कधीं इंग्लंड देशास उपद्रव कर णार नाहीं; आणि जर पुढे दोहों राज्यांत कांहीं वैर उ- पस्थित झालें, तर इंग्लंड देशाचा सर्वप्रकारें तोटा मात्र होईल; त्या साहसिक आणि गरीब स्काट् लोकांपासून दुसरे कांहीं प्राप्त होणार नाहीं. लार्ड यांस इकडे, आपली जुनी आणि स्वतंत्र राज्यनीति नाश पा वेल, ह्मणून स्काट् लोकांसही राग आला. वाटले की, आह्मास पार्लमेंट सभेत बसावयास अधिकार नाहीं, ही आपले प्रतिष्ठेची व अधिकाराची हानि. साव- कार लोकांनी व्यापारावर मोठे मोठे कर वसविले असे पाहिलें, आणि विचार केला की, वेस्टइंडीस देशांतील इंग्लिश संस्थानांत आह्मास व्यापार करावयाची सत्ता दि ली, तीपासून आह्मास लाभ होणार, हे कशावरून समजावें इंग्लिश सभांत असा विचार झाला कीं, मातबर आणि गरीब अशा दोन प्रजा एकत्र झाल्या असतां गरीबांचा स्वार्थ होतो, आणि धनवान् लोकांस त्यांचे विपत्तीचा मात्र कायतो विभाग लोक ह्मणूं लागले कीं, स्काट् लोक कर देतात तो फार थोडा, तो राज्यकारभारांत त्यांचा विभाग आहे त्यांस योग्य नाहीं. त्या करारांत टोरी लोकांनीं बहुत विश् आणिलीं; परंतु शेवटी ती सर्व जाऊन दोनही पार्लमेंट सभांत अधिक संमतानें तो ठरला. या रीतीनें त्या संयोगापासून कोणतें हित होईल, हे ज्यांचे बुद्धीस प्र- थम आले नव्हतें, त्या सर्वांस शेवटी त्याविषयी संमति देणे प्राप्त झालें.