पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ असावी; ते लार्ड यांस पार्लमेंट सभेत बसून संमति देणे, किंवा लार्ड यांचे चौकशीस बसणे, या खेरीज इंग्लिश लार्ड यांसारिखा अख्यार असावा; राज- चिन्ह आणि कामकारभाराची रीति हीं पूर्ववत राहावीं; दोनही राज्यांतील जे राज्य नियम, किंवा कायदे या कल- मांशीं विरुद्ध असतील ते त्या त्या देशचे पार्लमेंट सभेनें रद्द करावे. त्या संयोगाविषयींचे तहनाम्यांत मोठी इतकी कलमें होतीं; ती दोनही राज्यांतील पार्लमेंट सभांनी कबूल करावीं, इतकें मात्र शेष राहिलें. "त्या दोन सभांत या रीतीनें बोलत असत. स्काटलंड देशचे पार्लमेंट सर्भेत ह्मणत असत कीं, दोन राज्यांचा पूर्ण संयोग झाला असतां स्थिर स्वस्थतेचा पाया होईल; त्यांचा धर्म, स्वातंत्र्य, आणि मालमत्ता ही निर्भय राहातील; यांचे सामर्थ्य, आणि व्यापार वृद्धि पावतील; सर्व वेट प्री- तीनें एकत्र होईल, आणि भिन्न भिन्न मसलतीचे भयापा- सून सुटेल. शत्रूंचा पराजय करण्यास शक्ति येईल; नू- तन धर्माचे संरक्षण होईल, आणि युरोप देशचें खातंत्र्य राहील. अशी गोष्ट वोलून दाखविली कीं, सरकारी का- रभार चालवावयाकरितां जर एकच सभा असली, तर सरकारचे सामर्थ्य अधिक होईल. त्यांस दर्शविलें कीं, राज्यकारभारांत जितका तुमचा योग्य भाग आहे, तितके कर तुझास हा संयोग झाल्यावर द्यावे लागणार नाहीत. . इंग्लिश लोक कर देतात त्याचे सत्तरावा हिसाही तुह्मास द्यावा लागणार नाहीं; आणि असे असतां राज्यकारभारांत एक दशांशापेक्षांही तुमची सत्ता कमी नाहीं. त्या राज्य- संयोगास

  • अनुकूळ अशीं या रीतीचीं भाषणे स्काटलंड दे-