पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनापासून वास्तवीक होतें, त्यांचा मात्र त्यांत समावेश केला. त्यांस बसून विचार करावयासाठी राणीनें वैट्- हाल वाड्याजवळ काकपिट या नांवाचा वाडा योजिला होता, तेथें ते मिळाले. राजीनें त्यांना त्वरा करावी ह्म- णून बहुत वेळ सांगितले होते, त्याप्रमाणे त्यांनी ती कलमें लागलींच ठरवून सही केली, आणि तीं दोनही देशचे पार्लमेंट सभांपुढे ठेवावयाचें मात्र बाकी राहिले. या प्रसिद्ध तहनाम्यांत असे ठरलें कीं, संयुक्त राज्यां- तील प्रमुख हानोवर वंशांतील कोणी तरी पुरुषाजवळ असावें; संयुक्त राज्याचें नियुक्त पार्लमेंट एकच असावें. ग्रेट ब्रिटन देशांतील प्रजांची सत्ता आणि संपत्ति यांचा उपभोग एकेच रीतीने व्हावा; व्यापार व वसूल यांविषयों नेमणुकी व सत्ता सर्वांची सारखीच असावी; प्रजांचा अ- धिकार, राज्यकारभार, आणि नीति, हीं, दोनही राज्यांत एकच असावीं, स्काट्लंड देशांतील प्रजांचे उघड हिता- वांचून आंतले व्यवहाराविषयींचे नियम फिरवूं नये; राज्य संयोगाचे पूर्वी जसा अख्यार आणि सत्ता होती, तशीच पुढेही सेशन कोर्ट यांस आणि दुसरे अदालतींस असून ती त्या काळी होतीं तशीच पुढेही राहावीं; स्काट्लंड दे- शचे लार्ड सभेत सोळा सभासद आणि कामन्स समेत ४५ असावे; आणि तेव्हांची स्काटलंड देशची पार्लमेंट सभा ज्या रीतीने ठरवील, त्या रीतीनें सभासदांची नेमणूक व्हावी. स्काट्लंड एथील लार्ड यांस ग्रेटव्रिटन एथील लार्ड याप्रमाणे समजावें, आणि त्यांची योग्यता संयोगाचे पूर्वीचे त्या त्या पदावर इंग्लंड देशांत जे लार्ड असतील त्यांपेक्षां कभी, आणि पुढे नवे होतील त्यापेक्षा अधिक