पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कांत होता; परंतु शेवटी विग लोकांचे पक्षांत आला. कारण कीं, फ्रान्स देशचा अंमल कमी करावयाचें टोरी यांनी योजिलें, असे त्याने पाहिले. याकरितां विग लोक पूर्वीचे राजाचे वेत सिद्धीस न्यावयाविषयी आग्रह धरून युरोप देशांत सर्वत्र राजाची सत्ता कमी करण्याविषयी उ द्योग करीत होते. असे आहे की, ज्या राज्यांत लोकांचे मसलतीप्रमाणे कामगार चालतात, तेथें लोक जसे जसे बदलतात, तसतसे प्रधानही बदलले पाहिजेत. त्या काळी प्रजांचें मत बदलूं लागले होते, परंतु त्या विग प्रधानाचा नाश जवळ आला होता; तो व्हावयाचे पूर्वी पार्लमेंट स भेत एक मोठे कृत्य सिद्धीस गेले. तें हें कीं, इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन राज्यांचा मिलाफ झाला. प्रथम जेम्स याचे राज्यापासून या दोन देशांचें प्रभुत्व एकाच राजाकडे असे खरें; परंतु वेगवेगळे पार्लमेंट सभांचा अंमल असे, आणि समयीं त्या सभा परस्पर विरुद्ध वेत आणि युक्ति योजीत असत. त्या राज्यसंयोगाविषयींचा विचार या राज्याच्या प्रारं- भींच निघाला होता, परंतु पूर्वदेशचे व्यापाराविषयीं कांहीं तंटा पडल्यामुळे तो मोडला, आणि ठरलें कीं, तो संयोग होणें परम असाध्य. पुढें तो संयोगसंबंधी विचार दोनही पार्लमेंट सभांनी काढिला, आणि ठरविलें कीं, दोनही दे शचे मुख्यार नेमून त्यांनीं संयोगाचीं मुख्य मुख्य मूळ कळमें योजावीं, आणि मग दोघांचा पार्लमेंट सभांनी त्यांचा विस्तारेंकरून चांगला विचार करावा. ते मुख्- त्यार नेमावयाचें काम राणीकडे दिले. तेव्हा तिनें अशी सावधगिरी राखिली कीं, तो संयोग व्हावा, असे ज्यांचे