पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०९ तो ड्युक, चार्ल्स याचा परम स्नेही होता. त्याचें श- रीर कुरूप होतें; परंतु मन बहुत उदार, सभ्य, आणि उद्योगी असे. त्याजवळ नऊ हजारांपेक्षां किंचित् अधिक इतकी फौज असतां, त्यानें स्पेन देशास जाऊन बार्सि- लोना ह्मणून वळकट शहर आहे, त्यांत पांच हजार लोक होते, तें घेतलें. हातीं राहिला. या रीतीची फत्ते फार दिवस चालिली नाही; कारण अ यास कामावरून परत बोलावून चार्ल्स याचे फौजे- चा सरदारपणा लार्ड गाल्वे ह्मणून ग्रहस्थ होता, त्याचे आल्मांझा गांवांजवळ शत्रूचा सरदार दिला, असें ऐकून लढाईचा प्रारंभ सु- ड्युक बधिक यानें फौज घेऊन तळ लार्ड गालवे युद्धाकरितां तेथे गेला. मारे अडीच प्रहर दिवसास झाला, दोनही सैन्यांची चां गली लढाई चालू झाली. फौजेचे मध्यभागी फार करून ग्रेट ब्रिटन आणि हालंड देशच्या पलटणी होत्या, त्या जय मिळवितात, असा प्रथम मुमार दिसला; परंतु त्यांस आश्रय पोर्टुगीस घोडेस्वरांचा होता; ते स्वार युद्धाचे प्रारंभी पळून गेल्यामुळे इंग्लिश लोकांवर चहूकडून घेरा त्या विपत्तिकाळी ते चौरस उभे राहून एके उं- चस्थळी गेले; आणि देशची माहीतगारी नाहीं, जवळ साहित्य नाहीं असें झालें, ह्मणून सगळे सुमारें दाहा ह- जार लोक कैद केले गेले. हा शत्रूंचा विजय पूर्ण झाला; आणि पुढे क्याटालोनिया प्रांतावांचून सर्व स्पेन देश आपला स्वामी फिलिप याचे आज्ञेत वर्तू लागला. पडला. हा काळपर्यंत राणीचे प्रधान विग लोकांचे मंडळींतले होते, त्या आमात्यांमधील ड्युक मार्ल्वरो प्रथम टोरी लो-