पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ राजांस महाद्वीपांतले अन्य ठिकाणीं जसा लोभ होता, तसाच त्या देशावर झाला. चवदावे लुइस राजाचा नातू चवथा फिलिप त्या वेळेस बहुतकरून सर्व प्रजांचे अनुभ- तानें त्या देशचें राज्य करीत होता. स्पेन देशचे पूर्वील राजाचे मृत्युपत्रांतही त्यानेंच राज्य करावे असे होतें, परंतु युरोप देशचे राजांत पूर्वी एक तह झाला होता, त्यांत असे ठरले होते की, जर्मनी देशचा एंपरर याचा सुलगा चार्ल्स यानें तें राज्य करावें. या तहावर फ्रान्स देशाचीही प्रथम जामीनगत होती; परंतु त्यांनी पुढे बुव वंशाचा कोणी पुरुष राजपदावर वसावयाकरितां तो करार मोडावयाचा योजिला होता. स्पेन देशांतील क्याटलो- नियन लोकांनी चार्लस यास बोलावणे पाठविले; आणि इंग्लिश व पोर्टुगीस लोक आपले पक्षाचें युद्ध करितील, अशा भरंवशावर चार्लस यास त्या राज्याविषयीं यत्न करा- वयाची अधिकच उमेद आली. त्याजवळ स्पेन देशचें राज्य घ्यावयाकरितां भाड्याची तारवें दोनशें, लढाऊ गलबतें तीस, आणि नऊ हजार लोक इतके जमले; परंतु त्यांचा सरदारपणा अर्ल पीटर्बरो यानें कबूल केला; तो अल मोठा शूर होता. आणि तो एकला मोठे सैन्या- इतका पराक्रम करील असे लोकांस वाटले होतें. अर्ल पीटर्बरो त्या काळचे मनुष्यांत परम विचित्र आणि असाधारण पुरुष होता. पंधरा वर्षांचा असतांच त्यानें आफ्रिका देशचे मुसलमान लोकांशी बहुत लढाया के- ल्या; वीस वर्षांचे सुमारें जेम्स राजास काढून टाकण्या विषयीं मदतगारी केली; आणि आता त्यानें स्पेन देशांत स्वतः आपले खर्चीत लढाई चालविली. त्याचे कारण,