पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जे सरदार त्या मोल्हेड ठिकाणाजवळ होते, ते आज्ञेवांचून होड्यांवर माणसें चढवून तरवारी घेऊन आंत शिरले. परंतु त्यांनी मसलत पुरी केली नाहीं, कारण की, स्पानि- यार्ड यांनीं एक सुरुंग उडविला, तेणेंकरून दोन लेफटे- नंट आणि सुमारे शंभर लोक इतके मेले व जखमी झाले. तथापि हिक्स आणि जंपर या नांवांचे दोघे व्यापटन यांनी जवळची सपाट भूमि होती, ती हस्तगत करून ते क्याप्टन विटेकर आणि दुसरे नावाडी यांचे मदतीस आले. आणि त्यांनीं अकस्मात हल्ला करून मोल आणि शहर या दोहोंमधील जागा घेतली. पुढे त्या स्थानाचा अमलदार किल्ला स्वाधीन करावयास कबूल झाला; आणि हेसी याचा राजपुत्र तेथील किल्यामध्ये इतका बंदोबस्त 'असतां आपला यत्न सिद्धीस गेला ह्मणून आश्चर्ययुक्त झा ला. त्या विजयाचें वर्तमान इंग्लंड देशांत पोंचले तेव्हां, तें शहर हस्तगत झाले ह्मणून सरदारांची प्रशंसा करावी किंवा नाहीं याविषयीं बहुत वोलणें होऊन शेवटीं ठरलें कीं, करूं नये. निरुपयोगी कामाकरितां ड्युक मार्ल्- बरो याची बहुत प्रशंसा झाली; आणि सर जार्ज रूक यानें आपले देशावर इतका मोठा उपकार केला तरी त्या- ची अनास्था झाली, आणि त्याला सरदारपणापासूनही दूर केलें. तेव्हांपासून जिब्राल्टर, इंग्लिश यांचे स्वा- धीन आहे, आणि तें, मेदितरेनियन समुद्रांतले व्यापाराक- रितां किंवा युद्धाकरितां गलबतांस फार उपयोगी पडते. या रीतीनें जमीन आणि समुद्र या दोहोंतून इंग्लिश लोक विजय मिळवीत असतां, स्पेन देशांत दुसरे एक विरोधास कारण उत्पन्न झाले, ज्यापासून युरोप देशचे